एक्स्प्लोर

Kishori Pednekar : BMC डेड बॉडी बॅग प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना ईडीचे पुन्हा समन्स; आता 'या' दिवशी चौकशी होणार

BMC Covid Dead Body Bag Scam : कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात ईडीने मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावले आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) कोरोना काळात खरेदी केलेल्या डेड बॉडी बॅग (Dead Body Bag) खरेदी प्रकरणी ईडीने (ED) मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने याआधी बुधवारी, 8 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी इतर दिवशी चौकशी करण्याची विनंती केली होती. अखेर ईडीकडून आता 23 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडीने ECIR दाखक केले होते.  माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) आणि माजी महापालिका उपायुक्त (खरेदी/सीपीडी) आणि इतरांची देखील ECIR मध्ये नावं आहेत. कथित फसवणूकीची रक्कम सुमारे 49.63 लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर ईडी चौकशीसाठी काहींना समन्स बजावू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर ईडीने किशोरी पेडणेकर आणि ईडीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. 

काही दिवसापूर्वी किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र त्यांनी दोन आठवड्याची वेळ मागितली होती. त्यानंतर आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नवीन समन्स देऊन 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे.

अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू  यांची चौकशी 

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची ईडीने जवळपास 5 तास चौकशी केली.  कोरोनामुळे मृत झालेल्या मृतदेहांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेने बाजार भावापेक्षा अव्वाच्या सव्वा दराने ही डेड बॉडी बॅग खरेदी करण्यात आले असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेचे अधिकाऱ्यांसह आता तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कथित घोटाळा प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?

किशोरी पेडणेकरांनी डॉ. हरिदास राठोड (डेप्युटी डीन, केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभार) यांना व्हीआयपीएलकडून 1200 बॉडी बॅग खरेदी करण्यासाठी 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत प्रत्येकी 6 हजार 719 रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा तपासयंत्रणेनं आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साल 2020 मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे. 

वाढीव भावानं ही खरेदी केल्यानं या व्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय असून, त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह वेदांत इनोटेकचे (व्हीआयपीएल) संचालक आणि कंत्राटदार तसेच वरिष्ठ अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Nashik Crime : माझ्या बड्या राजकीय नेत्यांशी ओळखी, 15 कोटी द्या, थेट राज्यपाल करतो, नाशिकमधील 12 वी पास भामट्यानं घातला शास्त्रज्ञाला गंडा!
नाशिकमधील भामट्याचा शास्त्रज्ञावर राजकीय प्रयोग; राज्यपाल करतो म्हणत घातला गंडा
MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Blockbuster Movies in 2024 : अल्लू अर्जुन किंवा शाहरुख नव्हे, तर 'हा' अभिनेता 2024 चा बादशाह! बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात 6 ब्लॉकबस्टर चित्रपट
अल्लू अर्जुन किंवा शाहरुख नव्हे, तर 'हा' अभिनेता 2024 चा बादशाह! बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात 6 ब्लॉकबस्टर चित्रपट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Narvekar On opposition : संख्याबळ कमी असेल तरीही आवाज कमी राहणार नाही, नार्वेकरांचं विरोधकांना आश्वासनABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-Raj Thackeray Tweet on Waqf Board : वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदींना विरोध करण्यासारखं काही नाहीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Nashik Crime : माझ्या बड्या राजकीय नेत्यांशी ओळखी, 15 कोटी द्या, थेट राज्यपाल करतो, नाशिकमधील 12 वी पास भामट्यानं घातला शास्त्रज्ञाला गंडा!
नाशिकमधील भामट्याचा शास्त्रज्ञावर राजकीय प्रयोग; राज्यपाल करतो म्हणत घातला गंडा
MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Blockbuster Movies in 2024 : अल्लू अर्जुन किंवा शाहरुख नव्हे, तर 'हा' अभिनेता 2024 चा बादशाह! बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात 6 ब्लॉकबस्टर चित्रपट
अल्लू अर्जुन किंवा शाहरुख नव्हे, तर 'हा' अभिनेता 2024 चा बादशाह! बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात 6 ब्लॉकबस्टर चित्रपट
Jayan Patil & Ajit Pawar: अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
Suniel Shetty : पहिल्यांदा बहिणीकडून ओळख काढली; घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
बाईक राइडवर प्रेमात, घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
Mohammed Shami : रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
सुषमा अंधारेंचे बनावट औषध पुरवठा प्रकरणी तानाजी सावंतांवर गंभीर आरोप म्हणाल्या, 'ठरवून समांतर व्यवस्था उभी केली'
सुषमा अंधारेंचे बनावट औषध पुरवठा प्रकरणी तानाजी सावंतांवर गंभीर आरोप म्हणाल्या, 'ठरवून समांतर व्यवस्था उभी केली'
Embed widget