रेशनच्या गहू तांदळाचा काळाबाजार! मुंबईत मोठी कारवाई; आठ ते दहा कोटींचा माल जप्त
रेशनिंगच्या दुकानात वाटल्या जाणाऱ्या गहू, तांदळाचा मोठा साठा करून काळाबाजारी करणारे गोदामावर छापा टाकला. या कारवाईत आठ ते दहा कोटींचा माल जप्त केला असल्याची माहिती आहे.
मुंबई : मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरामध्ये आरे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येत असलेल्या रेशनिंगच्या दुकानात वाटल्या जाणाऱ्या गहू, तांदळाचा मोठा साठा करून काळाबाजारी करणारे गोदामावर छापा टाकला. या कारवाईत आठ ते दहा कोटींचा माल जप्त केला असल्याची माहिती आहे. तर 20 लोकांना ताब्यात घेतलं आहे. आरे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की आरे परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाचा रेशनिंगच्या मोठा साठा जमा करून त्या ठिकाणाहून मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काळाबाजार केला जात आहे.
याच माहितीच्या अनुषंगाने आरे पोलिसांनी रेशनिंग इंस्पेक्टरला सोबत घेऊन आरेमध्ये असलेल्या एका गोदामामध्ये मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी सहा ट्रकसोबत मोठ्या प्रमाणावर गहू तांदूळ जप्त केला आहे.
आरे पोलिसांनी माहिती मिळाली होती की आरे परिसरामध्ये शासनाचा गहू तांदूळ भरलेला सहा ट्रक माल एका खाजगी गाड्यामध्ये भरून विकला जाणार आहे. याच माहितीच्या आधारे आरे कॉल पोलिसांनी छापा टाकून सहा गाड्या जप्त केल्या. सध्या आरे पोलिसांनी रेशनिंगचा सर्व गाड्यांना जप्त करून कारवाई करत आहेत.
यात आठ ते दहा कोटींचा गहू तांदूळ असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरे परिसरामधून हा माल सर्व खाजगी वाहनात भरून मुंबईचा विविध भागांमध्ये ब्लॅकने विकला जाणार होता.
सध्या आरे पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देसाई एफसीयायच्या अधिकाऱ्यांशी बोलून पुढील चौकशी करत आहेत.
संबंधित बातम्या
MNS : मनसे नेते बाळा नांदगावकर रेशनिंग आयुक्तांच्या भेटीला,अधिकाऱ्यांना दिली घोटाळा करणा-यांची यादी