एक्स्प्लोर
Advertisement
भाजप नगरसेवकाला शिवसेना नगरसेविकांची मारहाण
मुंबई : मुंबई पालिकेच्या सभागृहातील जीएसटीनंतरचा धनादेश सुपूर्द करण्याचा शिवसेना आणि भाजपचा कार्यक्रम वेगळ्याच कारणानं चांगलाच गाजला.
शिवसेना - भाजप नगरसेवकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना शिवसेनेच्या नगरसेविकांनी मारहाण केली.
पालिका सभागृहाच्या लॉबीमध्ये ही मारहाण करण्यात आली.
दरम्यान, मकरंद नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचा दावा, शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला.
तर मी बाळासाहेबांबद्दल अपशब्द काढले नाहीत. सभागृह सुरु होण्याच्या आधीच शिवसेना नगरसेविकांनी मारहाण केली, असा प्रतिदावा मकरंद नार्वेकर यांनी केला.
तर नगरसेवकाला मारहाण करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नगरसेवक मनोज कोटक यांनी दिली.
दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मारहाणीबाबत काहीही माहित नसल्याचं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
मुंबई
मुंबई
Advertisement