Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
महिला डाॅक्टरने सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने थेट पोलिस निरीक्षक गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आणि पोलिस प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Satara Doctor Case: सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan Satara News) येथे घडलेल्या महिला डॉक्टरच्या (Phaltan Sub District Hospital suicide) आत्महत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टरचा मृतदेह हॉस्टेलमध्ये आढळला असून, हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने थेट पोलिस निरीक्षक गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आणि पोलिस प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेनंतर सातारा पोलीस दल आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे.
काकांकडून गंभीर खुलासा (Gopal Badne police inspector rape allegation)
डॉक्टरच्या काकांनी पुतणीच्या धक्कादायक आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, “ती अनेक दिवसांपासून तणावात होती. तिला पोस्टमार्टम करताना अहवाल बदलून देण्यासाठी दबाव आणला जात होता. तिने या त्रासाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) यांच्याकडे तक्रार केली होती, पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ती म्हणत होती, ‘मी आयुष्य संपवणार’.”
गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू (Phaltan woman doctor suicide)
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती. त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी तक्रार देत, “माझ्यावर अन्याय होत आहे; मी आत्महत्या करीन,” असा इशाराही दिला होता. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप सहकाऱ्यांकडून होत आहे.
सुसाईड नोटमधील गंभीर मजकूर (Female doctor suicide note Satara)
डॉक्टरच्या हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. पोलिस प्रशांत बनकर याने मला मानसिक छळ दिला.”
प्रकरणाची चौकशी सुरू (Satara shocking crime)
घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना केवळ एका डॉक्टरच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही, तर आरोग्य आणि पोलीस यंत्रणेतील दबावाच्या गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे. सातारा जिल्ह्यात या प्रकरणामुळे संताप आणि दुःखाची लाट उसळली आहे.
कोणालाही सोडणार नाही, पालकमंत्र्यांकडून आश्वासन (Satara doctor suicide case)
दरम्यान, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, या प्रकरणात पोलिस अधीक्षकांना घटनास्थळी भेट देण्यास सांगितलं असल्याचे म्हणाले. अधिकाऱ्यांचे या प्रकरणात नाव आल्याचे तुमच्याकडून मला माहिती मिळत आहे. मला याची पूर्ण माहिती नसून पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे, कोणालाही या प्रकरणात सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
























