एक्स्प्लोर
युतीबाबत तातडीने निर्णय घ्या, भाजपचा शिवसेनेला अल्टिमेटम
भाजपसोबत युती करायची, किंवा नाही करायची, जो काही निर्णय असेल, तर तो लवकर जाहीर करा, असा इशारा भाजपाध्यक्षांनी दिल्याची माहिती आहे.
मुंबई : शिवसेना-भाजपच्या युतीचं घोंगडं गेल्या काही महिन्यांपासून भिजत आहे. मात्र भाजपने शिवसेनेला दिलेल्या अल्टिमेटममुळे युतीबाबत लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. आहे. युतीबाबत लवकर निर्णय घ्या, अन्यथा दोन्ही निवडणुकांना एकत्रित सामोरे जा, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करायची, किंवा नाही करायची, जो काही निर्णय असेल, तर तो लवकर जाहीर करा, असा इशारा भाजपने दिल्याची माहिती आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने ही रणनीती आखल्याची चर्चा आहे.
भाजपच्या अल्टिमेटमवर शिवसेनेने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. युतीचा निर्णय न झाल्यास विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा दबाव भाजपने टाकल्याचीही माहिती आहे.
भाजपकडून कोणताही अल्टिमेटम आलेला नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते युतीबाबत निर्णय घेतील, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात सध्या भाजपच्या 22 तर शिवसेनेच्या 18 जागा आहेत. 'एबीपी माझा'ने सी व्होटरच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून देशाचा मूड जाणून घेण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील एनडीएच्या जागा कमी होऊ शकतात, मात्र स्वतंत्र लढल्यास शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. लोकसभेच्या 48 जागांची संभाव्य आकडेवारी -
सर्व स्वतंत्र पक्ष स्वतंत्र लढल्यास
भाजप - 22, काँग्रेस - 11, राष्ट्रवादी - 8, शिवसेना - 7
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यास
एनडीए - 36, यूपीए - 12
शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले, मात्र राष्ट्रवादी-काँग्रेस (आघाडी) एकत्र लढल्यास
एनडीए - 16, यूपीए - 30, शिवसेना - 2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement