एक्स्प्लोर
मनसेच्या विजयी उमेदवारावर भाजपच्या पराभूत उमेदवाराचा हल्ला

मुंबई : कलिना भागातील मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्यावर भाजपच्या पराभूत उमेदवारानं प्राणघातक हल्ला केला. भाजपचे उमेदवार सुधीर खातू यांच्यासह भाजपच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांनी तुरडेंवर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केला. संजय तुरडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कलिना प्रभाग क्रमांक 166 चे विजयी उमेदवार आहेत. मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांची प्रकृती गंभीर आहे. तुरडेंवर कुर्ल्यातील बैलबाजार येथील आगाशे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, या हल्ल्यात मनसेचे 10 ते 12 कार्यकर्तेही गंभीर जखमी झाले आहेत.
आणखी वाचा























