एक्स्प्लोर
शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार

मुंबई: शाब्दिक युद्धानंतर रस्त्यावर आलेल्या शिवसेना- भाजपमधील वाद वाढतानाच दिसत आहे.
स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमावर शिवसेनेनं बहिष्कार घातल्यानंतर आता भाजपनंही शिवसेनेचाच कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे. मुंबईत आज ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाला. या कार्यक्रमासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आमंत्रण दिलं होतं. मात्र त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
एवढंच नाही तर भाजपचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी सेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्ह आहेत.
या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे, रामदास कदम, आयुक्त अजॉय मेहता, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि भाजपच्या उपमहापौर अलका केरकर यांनी उपस्थिती लावली.
टीका करा, पण चांगल्या कामाचं कौतुकही करा
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "जिथं चुकतं तिथं टीका झालीच पाहिजे. मात्र पण चांगल्या कामाचं कौतुकही करायला हवं. महापालिकेवर किती ताण आहे, हेही लक्षात ठेवा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
