भिवंडी महानगरपालिका आयुक्त पदावरुन डॉ. प्रविण अष्टीकर यांची उचलबांगडी , नवे आयुक्त डॉ. पंकज आसिया यांनी स्विकारला पदभार
भिवंडी महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची कोरोना काळात तडका फडकीत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवीन IAS अधिकारी पंकज आशिया यांची भिवंडी महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
![भिवंडी महानगरपालिका आयुक्त पदावरुन डॉ. प्रविण अष्टीकर यांची उचलबांगडी , नवे आयुक्त डॉ. पंकज आसिया यांनी स्विकारला पदभार Bhiwandi Municipal Commissioner Praveen Ashtikar has been transferred new IAS officer Pankaj Asia has been appointed भिवंडी महानगरपालिका आयुक्त पदावरुन डॉ. प्रविण अष्टीकर यांची उचलबांगडी , नवे आयुक्त डॉ. पंकज आसिया यांनी स्विकारला पदभार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/21013114/WhatsApp-Image-2020-06-20-at-7.44.06-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महानगरपालिका प्रशासन त्यास आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याबाबत लोकप्रतिनिधी व नागरीकांमधून आरोप केले जात होते. महानगरपालिका आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी जोर धरत असताना राज्य शासनाने आज तडकाफडकी डॉ. प्रविण अष्टीकर यांची भिवंडी महानगरपालिका आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी नाशिक उपजिल्हाधिकरी तथा कळवण येथील प्रकल्प अधिकारी डॉ. पंकज आसिया या 2016 च्या तुकडीतील आय ए एस अधिकारी यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. शनिवारी (20 जून) सायंकाळी त्यांनी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयातील दालनात येऊन आपला पदभार स्विकारला आहे.
डॉ. प्रविण अष्टीकर यांच्या कार्यकाळात झालेले आर्थिक निर्णय वादग्रस्त ठरल्याबाबत त्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे आमदार रईस शेख यांच्यासह शिवसेना आमदार शांताराम मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने निवेदन देऊन मागणी केली होती. राज्य शासनाने महानगरपालिका प्रशासन प्रमुख आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी नियुक्तीचे भिवंडीकर नागरीकांनी स्वागत केला आहे.
भिवंडी महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची कोरोना काळात तडका फडकीत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवीन IAS अधिकारी पंकज आशिया यांची भिवंडी महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कारण मालेगावात कोरोनाच वाढत प्रादुर्भाव पाहता पंकज आशिया यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी चांगली कामगिरी बजावली असून परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याने भिवंडीत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आयुक्त प्रविण आष्टीकर यांनी निरोप घेत असताना भिवंडीत केलेले काम व त्यांची पद्धत सांगत भिवंडीकरांनी सामाजिक अंतर ठेवा कोरोनाच्या आजारापासून स्वतःला वाचवा व इतरांनाही वाचवा असे आव्हान देखील केलं आहे.
India Corona Update | देशात पहिल्यांदाच 24 तासात 14 हजारांहून अधिक कोरोनाबाधित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)