एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच; पुन्हा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईत घरफोड्या पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. टेम्पोच्या नंबरवरून पोलीस घरफोड्या 'गब्बर' व त्याच्या साथीदारांपर्यत पोहोचले आणि त्याला बेड्या ठोकल्या.

भिवंडी : लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईत घरफोड्याने दोन साथीदारांसह भिवंडी तालुक्यातील भूमी इंडस्ट्रियल मधील कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामातून 7 लाख 68 हजार रुपयांचे सोफ्याकरिता लागणारे कापडाचे वेगवेगळ्या कंपनीचे रोल एका टेम्पोत भरून लंपास केले होते. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी गब्बर उर्फ अजय हरिजन, मोहम्मद इरफान जैनुलआबिदिन शेख , संतोष खरात असे लाखोंच्या घरफोडी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपी त्रिकूटाकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालासह टेम्पो जप्त करण्यात आला आहे. तर अनेक लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच राहिल्याने तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सीसीटीव्ही फुटजेमुळे 'गब्बर' पोलिसांच्या जाळ्यात

घरफोडीचे गंभीर स्वरूप पाहता सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढाले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अभिजित पाटील, नितीन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक जे. आर. शेरखाने , यांच्यासह पोलीस पथकाने तपासला गती देत, चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक टेम्पो त्या दिवशी जाताना दिसला. या टेम्पोच्या नंबरवरून पोलीस घरफोड्या 'गब्बर' व त्याच्या साथीदारांपर्यत पोहोचली आणि त्याला बेड्या ठोकल्या.

काही दिवसापूर्वीच जेलमधून सुटला होता 'गब्बर'

घरफोडीच्या गुन्ह्यात अटक झालेला गब्बर काही दिवसापूर्वीच जेल मधून सुटला होता. त्यांनतर त्याने पुन्हा लाखोंची घरफोडी करण्यासाठी दोन साथीदारासह कट रचला होता. त्यानुसार 28 नोव्हेंबर रोजीच्या रात्रीच्या सुमारास कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामात साठवलेल्या महागड्या मुद्देमालावर डल्ला मारला होता. विशेष म्हणजे गब्बर हा घरफोडीतील सराईत गुन्हेगार असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या बनरासचा रहिवाशी असून त्याच्यावर अनेक घरफोडीचे जबरी गुन्हे दाखल असल्याची माहिती भिवंडी पोलीस परिमंडळचे पोलीस उप आयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget