मुंबईकरांचा प्रवास होणार आणखीन ‘बेस्ट’ : लाईव्ह लोकेशनच्या माहितीसह घरबसल्या काढता येणार तिकीट
या अॅपवरून प्रवाशांना बेस्ट बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. त्यामुळे आपल्या वेळेची प्रचंड बचत होईल. तसेच याच अॅपवरून बेस्टचे डीजिटल तिकीट आणि पास पण काढता येणार आहे. "चलो" असे या अॅपचे नाव आहे.
मुंबई : सतत होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठी मुंबईकर सतत प्रयत्नात असतात. याच पार्श्वभूमीवर बेस्टने आता एक अॅप काढले आहे. या अॅपमुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे. शिवाय बेस्ट बसचे लाईव्ह लोकेशनही समजणार आहे.
बेस्टने नुकतेच एक सुपर अॅप काढले आहे. या अॅपवरून प्रवाशांना बेस्ट बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. त्यामुळे आपल्या वेळेची प्रचंड बचत होईल. तसेच याच अॅपवरून बेस्टचे डीजिटल तिकीट आणि पास पण काढता येणार आहे. "चलो" असे या अॅपचे नाव आहे.
याआधी बेस्टने काढलेल्या अॅपला अत्यल्प प्रतिसाद होता. तसेच तांत्रिक अडचणी देखील समोर आल्या होत्या. आता मात्र जे "चलो अॅप" बनवण्यात आले आहे, ते आधीच भारतातल्या आग्रा, चेन्नई, भुवनेश्वर, लखनौ, कोलकाता, हुबळी, कानपूर, पाटणा, बेळगाव अशा 21 शहरात कार्यरत आहे. त्यामुळे हे अॅप लोकप्रिय होईल असा अंदाज आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारीमध्ये हे अॅप प्रवाशांना वापरता येईल.
BEST Super Saver Plan
दरम्यान, कालच बेस्ट प्रशासनानं प्रवाशी संख्या वाढवण्यासाठी प्रवासाचे 72 सुपर सेव्हर प्लॅन (BEST Super Saver Plan) जाहीर केले आहेत. त्यामुळे आता मुंबईत तुम्हाला रोजचा बस प्रवास करण्यासाठी मोबाईलच्या रिचार्जप्रमाणे प्लान निवडता येणार आहे. कारण बेस्ट प्रशासनानं प्रवाशी संख्या वाढवण्यासाठी प्रवासाचे 72 सुपर सेव्हर प्लॅन (BEST Super Saver Plan) जाहीर केले आहेत.
दररोजच्या प्रवासाची गरज पाहून प्रवाशांना हे प्लान निवडता येतील. त्यामुळे प्रवास खर्चात मोठी बचत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. बेस्टच्या या नव्या नियोजनानुसार, प्रवाशांना एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन करता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या