एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते; विखे पाटलांचा गौप्यस्फोट

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब याच्या संदर्भात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यात थोरात देखील भाजपात प्रवेश करणार होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. बाळासाहेब थोरात देखील भाजपात प्रवेश करणार होते, असा दावा विखे पाटलांनी केलाय. शिर्डीमध्ये बोलताना विखे पाटलांनी थोरातांवर टीकास्त्र डागलंय. थोरातांनी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भाजपच्या दावणीला बांधल्याची टीका देखील विखेंनी यावेळी केली. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहे. बाळासाहेब थोरात कुणाकुणाला भेटले होते, याची सगळी माहिती माझ्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. बाळासाहेब थोरातांना सगळं अपघातानं मिळालं आहे. त्यात त्यांचं स्वत:चं कतृत्व काहीच नाही. नगर जिल्ह्यातील 12 पैकी तीन जागा त्यांनी लढवल्या. त्यात त्यांना कसंबसं यश मिळाल्याचे विखे म्हणाले. त्यामुळे थोरात यांनी माझ्या काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची चिंता करू नये. कारण, दोन-तीन वर्षांपूर्वी थोरात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नात होते, असा गंभीर आरोप विखे-पाटील यांनी केला आहे. विखे पाटील शिर्डीमध्ये आले असता ते बोलत होते. मी काम केल्यानेच काँग्रेसला अच्छे दिन - मी विरोधी पक्षनेते असताना केलेल्या कामाचा फायदा काँग्रेसला झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला अच्छे दिन आले. उलट थोरात यांनी राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचा गंभीर आरोप विखे पाटील यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विखे बोलत होते. मी भाजपचा कार्यकर्ता : राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरवापसीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र, या चर्चांना स्वत: राधाकृष्ण विखे पाटलांनी पूर्ण विराम दिला आहे. मी भाजपमध्ये राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या येत असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं. हेही वाचा - मी भाजपचा कार्यकर्ता, भाजप सोडणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil | बाळासाहेब थोरातही भाजपात प्रवेश करणार होते : राधाकृष्ण विखे पाटील | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Embed widget