कल्याण, डोंबिवलीत अस्वच्छ बर्फाचा सर्रास वापर, एफडीएने कारवाई करण्याची केडीएमसीची मागणी
बर्फ आणि सरबताची तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली आहे.
![कल्याण, डोंबिवलीत अस्वच्छ बर्फाचा सर्रास वापर, एफडीएने कारवाई करण्याची केडीएमसीची मागणी bad quality ice use to make juice, KDMC demands FDA to take action कल्याण, डोंबिवलीत अस्वच्छ बर्फाचा सर्रास वापर, एफडीएने कारवाई करण्याची केडीएमसीची मागणी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/09184957/Ice.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : मुंबई महानगरपालिका हद्दीत 81 टक्के बर्फाचे नमुने दूषित असल्याचं आढळल्यानंतर कल्याण डोंबिवलीतही हा मुद्दा चर्चेत आला आहे. कारण कल्याण डोंबिवलीत सध्या सर्रासपणे निकृष्ट बर्फाचा वापर सुरु आहे.
कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांबाहेर असलेले अनधिकृत सरबतवाले, उसाच्या रसाच्या हातगाड्या आणि गोळेवाले यांच्याकडे या निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. कुर्ला रेल्वे स्थानकातला सरबताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हे सरबतवाले चर्चेत आले होते.
मात्र त्यावेळी त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती. त्यानंतर आता दूषित बर्फाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा या सरबतवाल्यांवर कारवाईची मागणी पुढे येऊ लागली आहे. बर्फ आणि सरबताची तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली आहे.
दूषित बर्फ शरीरासाठी अपायकारक ठरु शकतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात थंड पेय पिण्याच्या नादात तुम्ही रोगराईला आमंत्रण देत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे आता एफडीएने लक्ष देण्याची गरज आहे.
VIDEO | रेल्वे स्थानकांवर लिंबू सरबत पिणाऱ्यांनो सावधान संबंधित बातम्या रेल्वे स्थानकावर गलिच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल वांद्रे स्टेशनवर अन्नपदार्थांमध्ये उंदीर, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्टॉलधारकाला दंडमहत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)