एक्स्प्लोर
पूर्व, पश्चिम उपनगरांसह मुंबईत दिवसभर दमदार पावसाची हजेरी
मुंबईः मुंबई शहरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 39.84 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पश्चिम उपनगरांत 37.93 मिमी पाऊस झाला असून पूर्व उपनगरात 36.37 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मध्यरात्रीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. पूर्व उपनगरांत सकाळच्या वेळी दमदार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने गणेशभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे मुसळधार पावसातही गणेशभक्तांचा आनंद शिगेला पोहचला आहे. मुंबईतील चौपाट्यांवर भर पावसात गाजत-वाजत बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement