केडीएमसीच्या कार्यकारी अभियंत्यावर जीवघेणा हल्ला, पोलिसांकडून तपास सुरु
सुभाष पाटील हे केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात कार्यरत आहेत. मधूबन टॉकीजजवळ दबा धरून बसलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी पाटील यांच्या मानेवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केले.
![केडीएमसीच्या कार्यकारी अभियंत्यावर जीवघेणा हल्ला, पोलिसांकडून तपास सुरु Attack on KDMC engineer in Dombivali by unknown people केडीएमसीच्या कार्यकारी अभियंत्यावर जीवघेणा हल्ला, पोलिसांकडून तपास सुरु](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/22215217/Subhash-Patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावर आज डोंबिवलीत जीवघेणा हल्ला करण्यात आला. सुभाष पाटील असं या अभियंत्यांचं नाव असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
सुभाष पाटील हे केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात कार्यरत आहेत. आज संध्याकाळी सहाच्या सुमारास ते काम संपवून ठाण्याला घरी जाण्यासाठी निघाले. मात्र डोंबिवलीच्या स्कायवॉकवरुन ते जात असताना मधूबन टॉकीजजवळ दबा धरून बसलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी पाटील यांच्या मानेवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केले.
हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधलेले असल्यानं त्यांची ओळख पटू शकली नाही. या हल्ल्यात जखमी झालेल्या पाटील यांनी फोन करून आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर केडीएमसी कर्मचाऱ्यांनी त्यांना डोंबिवलीच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेतायत. हा हल्ला फेरीवाल्यांनी केला असण्याची प्राथमिक शक्यता सध्या व्यक्त होते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)