एक्स्प्लोर
बर्थडे पार्टीत अथर्व शिंदेचं रॅगिंग, वडिलांना संशय
आरे कॉलनीतील तलावाजवळ मृतावस्थेत सापडलेल्या अथर्व शिंदेच्या मृत्यूचा तपास आता क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे.
मुंबई : गोरेगावमधील आरे कॉलनीत तलावाशेजारी मृतावस्थेत सापडलेल्या अथर्व शिंदेच्या मृत्यूचा तपास आता क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. बर्थडे पार्टीमध्ये अथर्वचं रॅगिंग करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय वडिलांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
क्राईम ब्रँचचे पोलिस उपायुक्त नासिर तांबोळी यांनी लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असं सांगितलं.
आरे पोलिसांकडून अथर्व मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु होता, मात्र त्यातून काहीही निष्कर्ष काढण्यात पोलिसांना यश आलं नाही. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांनी हा तपास क्राइम ब्रँचकडे सोपवण्याची मागणी केली होती. शिंदे कुटुंबीयांनी राज्याचे पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तांना तसं पत्र पाठवलं होतं.
बर्थडे पार्टीमध्ये अथर्वचं रॅगिंग करण्यात आलं असावं, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असावेत, असं अथर्वच्या वडिलांनी पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
काय आहे प्रकरण?
रविवार, 6 मे रोजी संध्याकाळी आरे कॉलनीतील रॉयल पाम्समधील बंगला क्रमांक 212 भाड्यावर घेऊन एका तरुणीने आपली बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला उपस्थित असलेल्या अथर्व शिंदेचा मृतदेह आरे कॉलनीतील तलावाजवळ बुधवारी सकाळी सापडला होता.
अथर्वचा मृत्यू झाला, त्या रात्री वाढदिवसाच्या पार्टीत हजर असलेल्या तरुण-तरुणींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यामध्ये बर्थडे गर्लचाही समावेश असून संबंधित तरुणी एका प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्मात्याची मुलगी असल्याची माहिती आहे. भाड्याने घेतलेल्या बंगल्याच्या केअरटेकर आणि स्टाफलाही ताब्यात घेण्यात आलं होतं.
अथर्व शिंदे हत्या प्रकरणी बर्थडे गर्लसह 12 जण ताब्यात
ताब्यात घेण्यात आलेले सर्व तरुण उच्चभ्रू कुटुंबातील होते. पार्टीला आलेल्या बहुतांश तरुणांनी मद्यपान किंवा ड्रग्सचं सेवन केलं होतं, असं त्यांच्या कुटुंबीयांनीच सांगितलं. मयत अथर्व शिंदेचे वडील नरेंद्र शिंदे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागात कार्यरत आहेत.
अथर्वने पुण्यातून साऊण्ड इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर तो घरुनच काम करायचा. अथर्व आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
पार्टीतील सर्वांना अथर्व ओळखत नव्हता, मात्र त्या रात्री अथर्व इतरांसोबत बंगल्यावरच राहिला. पार्टीमध्ये तरुणांमध्ये मोठी वादावादी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये अथर्व पार्टी असलेल्या बंगल्यातून धावत बाहेर पडत आहे, तर काही तरुण त्याच्या मागे लागल्याचं पाहायला मिळत होतं. बंगल्यापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या तलावाजवळ अथर्वचा मृतदेह आढळला होता. अथर्वला मुका मार लागला असून मृतदेहावर काही जखमा आढळल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement