एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: मनोज जरांगेंनी नाक दाबताच झटक्यात तोंड उघडलं; आयुक्तांना सुट्टी देणार नाही म्हणताच बीएमसीकडून प्रसाधनगृहांची उभारणी, थेट फोटो शेअर, आझाद मैदानात खडी टाकली

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: आझाद मैदानामध्ये लाईटची सुद्धा उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यासोबत चार वैद्यकीय पथक त्याचबरोबर रुग्णवाहिका मैदानामध्ये तैनात करण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातील झालेल्या गैरसोयीवरून थेट मुंबई महापालिका आयुक्तांना गर्भित इशारा दिल्यानंतर महापालिकेची पळापळ सुरू झाली आहे. जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता मुंबई महापालिकेकडून आझाद मैदान परिसरामध्ये पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सुट्टी देणार नाही म्हणताच बीएमसीकडून आझाद मैदान परिसरामध्ये प्रसाधनगृहांची उभारणी केल्याचे फोटो शेअर करण्यात आले. दरम्यान, काल मैदान परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल पसरला होता. त्यामुळे लाल चिखलामध्येच आंदोलकांना बसण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये खडी सुद्धा पसरण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

आरोपांना बीएमसी प्रशासनाकडून खोडून काढण्याचा प्रयत्न

इतकेच नव्हे तर जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांना बीएमसी प्रशासनाकडून खोडून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सुद्धा दिसून येत आहे. आझाद मैदानामध्ये लाईटची सुद्धा उभारणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यासोबत चार वैद्यकीय पथक त्याचबरोबर रुग्णवाहिका सुद्धा मैदानामध्ये तैनात करण्यात आली आहे. चिखल झालेल्या परिसरामध्ये जवळपास दोन टन खडी पसरण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता बीएमसी प्रशासन खडबडून जागा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. 

मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना इशारा

मला जरांगे पाटील म्हणाले की, बीएमसी आणि सीएसएमटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे की, शांततेने घ्या. तुम्हाला जेवायला मिळाले नाही. मुख्यमंत्री तुम्हाला पाणी मिळू देत नाहीत. कारण सध्या प्रशासक आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. तुम्ही सेवानिवृत्त जरी झाले तरी आयुक्त साहेब तुम्हाला सुट्टी देणार नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचा पाणी बंद केलं. चांगल्या चांगल्यांची जिरली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना कधी बदल होत असतो. त्यावेळेला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? असे म्हणत त्यांनी बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे.  

आंदोलक माणसं आहेत, याचा सरकारला विसर पडलाय का? 

दरम्यान, सोयीसुविधा ब्लाॅक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रोहित पवार यांनीही हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय? सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Rohini Khadse On Eknath Shinde Pune MPSC Protest: आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला अन् बाप संतापला; 20 वर्षीय पोटच्या मुलीचा बापानेच काटा काढला; मुंबईतील धक्कादायक घटना
दुसऱ्या लग्नाला विरोध केला अन् बाप संतापला; 20 वर्षीय पोटच्या मुलीचा बापानेच काटा काढला; मुंबईतील धक्कादायक घटना
Andheri Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तीन वर्षे अत्याचार, शिंदे गटाचा युवा नेता शिवम दुबे उर्फ 'चोंग्या'ला अंधेरीत बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तीन वर्षे अत्याचार, शिंदे गटाचा युवा नेता शिवम दुबे उर्फ 'चोंग्या'ला अंधेरीत बेड्या

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Embed widget