एक्स्प्लोर

अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य, महाराष्ट्र पोलिसांचे आभार; अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य आहे. आजच्या दिवसासाठी मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच माझ्या बाबांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असूनही कोणतीही कारवाई झाली नाही," असं आज्ञा नाईक म्हणाल्या.

मुंबई : "अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासह नावं लिहिली आहेत. त्यांच्यामुळेच माझ्या वडिलांनी आणि आजीने आत्महत्या केली. आजच्या दिवसासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. महाराष्ट्र पोलिसांनी यापुढे निपक्ष तपास करावा. आम्हाला राजकारण करायचं नाही, फक्त न्याय हवा आहे," अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी दिली. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि आज्ञा नाईक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

माझ्या वडिलांनी आणि आजीने 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितीश सार्डा या तिघांची नावं आहेत. अर्णब गोस्वामी यांच्यामुळेच अन्वय नाईक यांना त्यांच्या कामाची उर्वरित रक्कम मिळाली नाही. ती रक्कम दिली असती तर ते आज जिवंत असते, असं अक्षता नाईक यांनी सांगितलं. तर आज्ञा नाईक यांच्या माहितीनुसार, "अर्णब गोस्वामी सातत्याने माझ्या वडिलांना धमकी देत होते, तुला पैसे कसे मिळतात तेच पाहतो. तुझ्या मुलीचं करिअर उद्ध्वस्त करतो, अशी धमकी दिली होती."

संपूर्ण काम 6 कोटी 40 लाख रुपयाचं होतं. 83 लाख रुपयांचं देणं होतं. परंतु ते पैसेही त्यांनी दिले नाही, असा दावा अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय? ज्यात अर्णब गोस्वामींना अटक झालीय!

"सुशांत सिंह प्रकरणात अर्णब गोस्वामी यांनी आवाज उठवला. त्या प्रकरणात तर कोणतीही सुसाईड नोट नव्हती. परंतु माझ्या बाबांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असूनही कोणतीही कारवाई झाली नाही," असं आज्ञा नाईक यांनी सांगितलं. फक्त अर्णब गोस्वामी यांच्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला.

या संदर्भात तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे, रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, तपास अधिकारी सुरेश वऱ्हाडे यांना भेटलो होत. सुरेश वऱ्हाडे यांनी मार्च 2020 पर्यंत त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच पीएमओला ई-मेल केला. परंतु काहीच उपयोग झाला नाही, असा दावा कुटुंबीयांनी केला.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

रिपब्लिक टीव्हीची बाजू आज संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलिसांची कारवाई पाहिली. सकाळी 7.45 वाजता रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या घरी महाराष्ट्र पोलीस घुसले. जबरदस्तीने कॅमेरे बंद केले. अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की केली आणि घरातून फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं. हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. भारतातील एका वृत्तवाहिनीच्या संपादकाला केसांना पकडून फरफटत नेऊन अटक केली जाते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पोलिसांनी कॅमेरे बंद केले आणि अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली. सासू-सासऱ्यांना औषधं देण्यासही पोलिसांनी अर्णब यांना रोखलं. शिवाय त्यांच्या मुलालाही धक्काबुक्की केली. सोबतच त्यांनी लेखी कायदेशीर नोट रेकॉर्डवर ठेवण्यास परवानगी नाकारली. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी भारताच्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या संपादकाला ओढत नेलं, जसं की ते गुन्हेगार आहेत. अर्णब यांना आधी कोणतंही समन्स बजावलं नाही आणि कायदेशीर टीमला भेटूही दिलं नाही. "मी काय करु शकतो हे तुला माहित नाही," असं पोलीस पथकाचे अधिकारी सचिन वझे अर्णब गोस्वामी यांना म्हणाले. मी सहकार्य करेन असं वारंवार सांगूनही कोणतीही प्रक्रिया न करता अर्णब गोस्वामी यांना क्राईम ब्रान्च युनिटकडे सोपवलं आणि त्यांना धक्काबुक्की केली. सशस्त्र पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की करुन पोलीस व्हॅनमध्ये ढकललं. अर्णब गोस्वामी म्हणाले की, "त्यांनी मला मारहाण केली. त्यांनी मला शारीरिक धक्काबुक्की केली. आमच्यासाठी लढा, असं मला भारताच्या लोकांना सांगायचं आहे. माझ्या मुलाला मारहाण केली." मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार अधिकाराचा आणि वर्दीचा वापर करुन हल्ला करत आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय किंवा तथ्याशिवाय बंद झालेली केस पुन्हा ओपन करुन केवळ अर्णब गोस्वामी यांना वॉरंटशिवाय अटक करणं हे धक्कादायक आहे. भारत त्याविरोधात उभा राहणार आहे. एन्काऊंटर कॉप आणि परमबीर सिंह यांचा उजवा हात असलेल्या सचिन वझे यांनी रिपब्लिक टीव्हीला सांगितलं की, "आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे." 2018 मधल्या एका आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी केली होती आणि कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करुन असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं. सत्तचे गैरवापर करणाऱ्या, कायदा पायदळी तुडवणाऱ्या आणि माध्यमांची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्ही निषेध करते. फेक टीआरपी स्कॅमवरुन रिपब्लिक टीव्हीच्या न्यूजरुममध्ये पोहोचण्याची मुंबई पोलिसांची दुष्ट बाजू समोर आली. आता कोर्टाने बंद केलेल्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक धक्कादायक आहे. आम्ही भारताच्या नागरिकांना, माननीय कोर्टाला आणि वरिष्ठ संस्थांना आवाहन करतो की, "त्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातील आणीबाणीविरोधात उभं राहिलं पाहिजे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन आम्ही करतो. रिपब्लिक मीडिया नेटवर्क शेवटपर्यंत लढत राहणार आहे आणि सत्याचा विजय होईल यात शंका नाही. सत्य कधीच पराभूत होत नाही." अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य, महाराष्ट्र पोलिसांचे आभार; अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal EXCLUSIVEPravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूटChandrpur Tiger : जेव्हा वाघोबा वाट अडवतो, मामा मेल वाघाचा व्हिडिओ व्हायरलABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 19 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Embed widget