एक्स्प्लोर

Andheri By Poll Election: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अत्यंत कमी मतदान, बहुतांश मतदारांनी फिरवली पाठ

Andheri By Poll Election: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीवरून सुरुवातीपासून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातून अखेर आज मतदान होतंय आणि 6 नोव्हेंबरला  निकाल लागणार आहे.

Andheri By Poll Election: महाराष्ट्र विधानसभेच्या '166- अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व 256 मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी 7 वाजेपासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली . यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीवरून सुरुवातीपासून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातून अखेर आज मतदान होतंय आणि 6 नोव्हेंबरला  निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत.

आज सकाळपासून या पोटनिवडणुकीचं मतदान संथ गतीनं होत असल्याचं पाहायला मिळालं. सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदान झालं होतं तर दुपारी एक वाजेपर्यंत 16.89 टक्के तर दुपारी 3 वाजेपर्यंत 22.85 टक्के मतदान झालं होतं. तर 5 वाजेपर्यंत 28.77 टक्केच मतदान झालं आहे. अजून काही मिनिटं आता मतदानाची प्रक्रिया बाकी आहे. आज होणाऱ्या मतदानासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती, तरी देखील झालेलं मतदान पाहता लोकांनी सुट्टी एन्जॉय केल्याचंच दिसून येतंय.

अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली होती. आता ऋतुजा लटके यांच्यासमोर सहा अन्य उमेदवारांचं आव्हान आहे.

या पोटनिवडणुकीसाठी हे 7 उमेदवार रिंगणात 

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. श्री. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
३. श्री. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)
५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. श्री. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. श्री. राजेश त्रिपाठी (अपक्ष)

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 256 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. पोलिसांसह 1600 कर्मचारी आणि CRPF च्या 5 कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत. आता 6 नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे. तसं तर भाजपच्या उमेदवाराच्या माघारीनंतर ऋतुजा लटके यांचा रस्ता सुकर झाला आहे मात्र अंतिम निकाल हाती येईस्तोवर सर्वांचं लक्ष अंधेरी पूर्वकडे असणार आहे.

हे देखील वाचा- Andheri Bypolls 2022 Live Updates : अंधेरी पूर्व मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभाEknath Shinde Meeting : कोल्हापूरसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा बैठक, घाटगेंसोबत चर्चाSanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यताUjjwal Nikam  Mumbadevi :  उज्जवल निकम मुंबा देवीच्या दर्शनाला : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
IPL 2024 DC vs MI: रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
Eknath Shinde: मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याची हमी
मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याचा शब्द
IPL 2024 Latest Points Table: दिल्लीची मोठी झेप, मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
दिल्लीची मोठी झेप, मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Horoscope Today 28 April 2024 : एप्रिलचा शेवटचा रविवार 12 राशींसाठी शुभ की अशुभ? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
एप्रिलचा शेवटचा रविवार 12 राशींसाठी शुभ की अशुभ? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Embed widget