एक्स्प्लोर
अंधेरी पूल दुर्घटना : रेल्वे आणि रस्ते प्रवासासाठी पर्यायी मार्ग
अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने पुलाचा मोठा भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईकर कामावर पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग शोधून ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई : अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने पुलाचा मोठा भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वांद्रे-गोरेगावदरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे मुंबईकर पर्यायी मार्ग शोधून ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहतुकीसाठी काय आहेत पर्याची मार्ग? - पश्चिम द्रुतगती मार्गानंही प्रवास करून प्रवासी मुंबई गाठू शकतात - अंधेरी पूर्व ते पश्चिम प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बिस्लेरी जंक्शन-तेली गल्ली-सुर्वे चौक-अंधेरी सब वे-एस व्ही रोड या मार्गाचा वापर करावा - अंधेरी पश्चिम ते पूर्व प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जेव्हीपीडी-सुजय हॉस्पिटल जंक्शन-मिठीबाई कॉलेज-एसव्ही रोड-कॅ. गोर उड्डाणपूल पार्ले-पार्ले पूर्व-आधार जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मार्गाचा वापर करावा - एसव्ही रोड ते वेस्टर्न हायवे किंवा वेस्टर्न हायवे ते एसव्ही रोड जाणाऱ्यांनी मृणलताई गोरे उड्डाणपूल/खिरा नगर जंक्शन-मिलन उड्डाणपूल/ खार सब वे या मार्गाचा वापर करावा - अंधेरीपासून विविध 31 मार्गावर जादा बसेस, तर चर्चगेट ते वांद्रे ज्यादा लोकल सोडल्या आहेत - अंधेरी-विलेपार्ले अंधेरी पश्चिम रेल्वेच्या पूर्व आणि पश्चिम डेपोतून विशेष बसेस - वसई-विरारला राहणारे नागरिक बसने ठाणे-घोडबंदर मार्गे मध्य रेल्वे मार्गावर पोहचू शकतात - पश्चिम रेल्वेचे प्रवासी आज मध्य रेल्वेवरून मोफत प्रवास करू शकतात - पश्चिम रेल्वेचे प्रवासी मेट्रोनं घाटकोपरवरून मध्य रेल्वेमार्गे मुंबईला जाऊ शकतात - वांद्रे ते चर्चगेटपर्यंतची पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत संबधित बातम्या LIVE: अंधेरीत ब्रिजचा फूटपाथ कोसळला, पाच जण जखमी अंधेरी पूल दुर्घटना : आतापर्यंत काय-काय घडलं? अंधेरी स्टेशनवर पुलाचा भाग कोसळला, रेल्वे वाहतूक ठप्प
आणखी वाचा























