एक्स्प्लोर

Amruta Fadanvis : महाराष्ट्रात फडणवीस भाजपच्या मागे अन भाजप फडणवीसांच्याच मागे राहणार, अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया 

Amruta Fadanvis : चार राज्यांतील निवडणूक निकालानंतर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आता तुम्हाला भाजपचं प्रत्येक ठिकाणी दिसणार असल्याचं त्यांनी म्हटलं. 

मुंबई : देशातील चार राज्यांतील निवडणुकांचे (Assembly Election Result) कौल आता समोर आले आहेत. यामध्ये चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजप वरचढ ठरल्याचं पाहायला मिळत आहे. मध्यप्रदेश (MadhyaPradesh), राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीगड (Chhattisgarh) या राज्यांमध्ये भाजप (BJP) आघाडीवर आहे. यावर अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली. आता भाजप सगळीकडे नंबर 1 पक्ष असणार असल्याचं त्यांनी म्हटलं. भाजप आणि देवेंद्रजी (Devendra Fadanvis) मिळून भाजप सत्तेत आणणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी अमृता फडणवीसांनी दिली. दरम्यान तेलगंणा राज्यात काँग्रेसला यश मिळाल्याचं चित्र आहे. पण इतर 3 राज्यांमध्ये मात्र काँग्रेसची (Congress) पिछेहाट झालीये. 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अपेक्षा असतानाही त्यांना जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे 1980 नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी बेल्टमध्ये काँग्रेसची (Congress In Hindi Belt) सत्ता नसेल. त्यामुळे हिंदी बेल्टमधून काँग्रेस 'आऊट' झाल्याचं स्पष्ट झालंय. 

अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

भाजप आता इथून पुढे सगळीकडे नंबर 1 च पक्ष राहणार. महाराष्ट्रामध्येही देवेंद्र फडणवीस भाजपच्या मागे आणि भाजप देवेंद्र फडणवीसांच्याच मागे राहणार आणि भाजप आणि देवेंद्रजी मिळून भाजप आणणार. आजचा निकाल हा अपेक्षितच होता. आता इथून पुढे तुम्हाला सगळीकडे भाजपचं दिसेल, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली. 

आता मन मन मोदी - मुख्यमंत्री शिंदे

 कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काँग्रेसनं आश्वासनं दिली पण ती पूर्ण केली नाहीत, त्यामुळे येत्या काळात जनतासुद्धा काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  केली.  घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता 'मन मन मोदी' असे निकाल लागलेत, मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं,  असे देखील  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान चार राज्यांतील निवडणूक निकालांमधून भाजपची आघाडी असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे या निकालाचा फायदा भाजपला लोकसभेच्या निवडणुकांमध्येही होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जनता कोणाला कौल देणार हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. त्याचप्रमाणे या निकालानंतर भाजप लोकसभेच्या निवडणुकांसाठी कोणती रणनिती आखणार हे पाहणं देखील गरजेचं ठरणार आहे. 

हेही वाचा :

घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता 'मन मन मोदी' असा निकाल; मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर : मुख्यमंत्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Priyanka Gandhi : काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis :उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस भेटीचा, EXCLUSIVE VIDEOUddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?Manoj Jarange Full PC : ....नाहीतर या आंदोलनात माझा अंतही होऊ शकतो - मनोज जरांगेUddhav Thackeray Full PC : विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Priyanka Gandhi : काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
Sudhir Mungantiwar : एकीकडे छगन भुजबळांच्या नाराजीने राजकारण ढवळून निघालं, तिकडे मुनगंटीवारांचे कार्यकर्तेही बाहेर पडले, चंद्रपुरात घडामोडींना वेग
एकीकडे छगन भुजबळांच्या नाराजीने राजकारण ढवळून निघालं, तिकडे मुनगंटीवारांचे कार्यकर्तेही बाहेर पडले, चंद्रपुरात घडामोडींना वेग
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
Ajinkya Rahane: टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
Stock Market Crash : शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला, निफ्टीचं काय झालं?
बँकिंग क्षेत्राला जोरदार फटका, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, निफ्टीचं नेमकं काय झालं?
Embed widget