एक्स्प्लोर

Priyanka Gandhi : काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!

Priyanka Gandhi : पाकिस्तान सरकारमधील माजी मंत्री फवाद हसन चौधरी यांनीही पॅलेस्टीनला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि आमच्या खासदारांमध्ये तेवढी हिंमत नाही, असे सांगितले.

नवी दिल्ली : वायनाड लोकसभा खासदार प्रियांका गांधी मंगळवारी संसदेत बॅग घेऊन पोहोचल्या, ज्यावर बांगलादेशी हिंदू आणि ख्रिश्चन एकत्र उभं रहा, असे लिहिले होते. एक दिवस आधी त्या पॅलेस्टाईनला समर्थन देणाऱ्या बॅग घेऊन आल्या होत्या. ज्यावर पॅलेस्टीन मुक्त होईल असे लिहिले होते. त्यावरून वादही निर्माण झाला होता. प्रियांका यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सांगितले होते की, मी कसा पेहराव करणार हे दुसरे कोणीही ठरवणार नाही, वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढीवादी पितृसत्तेवर माझा विश्वास नाही, मला पाहिजे ते परिधान करेन. पाकिस्तान सरकारमधील माजी मंत्री फवाद हसन चौधरी यांनीही पॅलेस्टीनला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि आमच्या खासदारांमध्ये तेवढी हिंमत नाही, असे सांगितले.

फवाद हसन चौधरी यांनी पॅलेस्टीनला पाठिंबा दिल्याबद्दल प्रियांकाचे कौतुक केले

पाकिस्तानच्या इम्रान सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या फवाद हसन चौधरी यांनी पॅलेस्टीनला पाठिंबा दिल्याबद्दल प्रियांकाचे कौतुक केले आहे. त्यांनी X वर लिहिले की, जवाहरलाल नेहरूंसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नातवाकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? प्रियांका यांनी आपला स्तर आणखी उंचावला आहे, आजपर्यंत एकाही पाकिस्तानी खासदाराने असे धाडस दाखवले नाही हे लज्जास्पद आहे. प्रियांका म्हणाल्या की, बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांकांवर सरकारने आवाज उठवला पाहिजे. 

प्रियांका गांधी यांनी सोमवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासातही प्रश्न विचारला होता. त्या म्हणाल्या की, मला ज्या पहिल्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे ती म्हणजे या सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे, त्यांच्याशी बोलून त्यांचा पाठिंबा मिळवावा. दुसरा मुद्दा म्हणजे आज लष्कराच्या मुख्यालयातून एक छायाचित्र काढण्यात आले आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराला शरण येत आहे. आज विजय दिवस आहे. सर्वप्रथम मला 1971 च्या युद्धात आपल्यासाठी लढलेल्या शूर जवानांना सलाम करावासा वाटतो.

प्रियंका पुढे म्हणाल्या की, बांगलादेशात जे काही घडत होते, बांगलादेशातील लोकांचा, आमच्या बंगाली बांधवांचा आवाज कोणीही ऐकत नव्हता. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, मला त्यांना सलाम करावासा वाटतो. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी धैर्य दाखवले आणि देशाला विजयाकडे नेणारे नेतृत्व दाखवले.

बांगलादेशात ऑगस्ट 2024 पासून हिंदूंवर हल्ले सुरूच  

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हिंदूंवरील धार्मिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 'सेंटर फॉर डेमोक्रसी, प्लुरॅलिझम अँड ह्युमन राइट्स' (CDPHR) च्या अहवालानुसार, बांगलादेशमध्ये 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान हिंदूंच्या लुटीच्या 190 घटना घडल्या. 32 घरांना जाळपोळ, 16 मंदिरांची तोडफोड आणि 2 लैंगिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल आहेत. अहवालानुसार, 20 ऑगस्टपर्यंत हिंदूंविरुद्ध हिंसाचाराची एकूण 2010 प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये हिंदू कुटुंबांवरील हल्ल्याच्या 157 आणि मंदिरांच्या विटंबनेच्या 69 प्रकरणांचा समावेश आहे. युनूस सरकारने इस्कॉनचे संत चिन्मय कृष्ण दास यांना 25 नोव्हेंबर रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. चिन्मय प्रभूच्या अटकेनंतर चितगावमध्ये हिंसाचार पसरला होता. या हिंसाचारात एका वकिलाचाही मृत्यू झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहाAditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget