Worli Hit And Run Case : चूक झाली, माझं करिअर उद्ध्वस्त, घटनेचा पश्चाताप होतोय; पोलिसांसमोर मिहीर शाहाची रडारड
Worli Accident : पोलीस चौकशीत मिहीर शाहनं आपली चूक मान्य केल्याची माहिती मिळाली. माझ्या हातून घडलेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय, असंही मिहीर शाहनं म्हटल्याचं समोर आलं आहे.

Worli Hit And Run Case : मुंबई : वरळीतील (Worli Accident) हिट अँड रन प्रकरणानं (Hit And Run Case) संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शाह तब्बल तीन दिवस फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला विरारमधून अटक केली. मिहीरसोबतच 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. निर्दयी मिहीरनं कावेरी नाखवा यांना अत्यंत क्रूरपणे दोनदा चिरडलं. पण आता याच निर्दयी आरोपीला पश्चाताप होतोय, असं त्यानं सांगितलंय. पोलीस चौकशीत मिहीर शाहनं आपली चूक मान्य केल्याची माहिती मिळाली. माझ्या हातून घडलेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय, असंही मिहीर शाहनं म्हटल्याचं समोर आलं आहे.
पोलीस सध्या मिहीर शाह आणि त्याच्यासोबत घटना घडली त्यावेळी असलेल्या ड्रायव्हरचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. अशातच पोलिसांसमोर दोघांनीही त्यांच्या हातून झालेल्या गुन्हाची कबुली दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच, कबुली दिलेल्या मिहीर शाहाला आता पश्चाताप होतोय, असंही त्यानं पोलिसांना सांगितलं आहे. माझ्या हातून मोठी चूक झाली, माझं करिअर उद्ध्वस्थ झालंय, असंही मिहीर म्हणाल्याची माहिती मिळत आहे.
माझ्या हातून चूक झाली, झालेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय : मिहीर शाह
माझ्या हातून चूक झाली, झालेल्या घटनेचा मला पश्चाताप होतोय, अशी कबुली वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शर्मानं दिली आहे. या घटनेनं माझं करिअर संपलेलं आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया चौकशीत मिहीरनं दिल्याची माहिती मिळत आहे. आरोपी मिहीर शाह आणि राजऋषी बिडावत दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. दोघांनाही रात्री अपघाताच्या ठिकाणी नेण्यात आलं होत आणि घटनाक्रम पोलिसांनी समजून घेतला. आरोपी मिहीर आणि बिडावत यांनी सांगितलेल्या आणखी काही गोष्टी पोलीस पडताळून बघत आहेत.
वरळी हिट अँड रन प्रकरणाचं मुंबई पोलिसांकडून रिक्रिएशन
मुंबई पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगानं फिरवण्यास सुरुवात केली आहे. काल मध्यरात्री मिहीर शाह, चालक राजऋषीला घटनास्थळी नेत मुंबई पोलिसांनी घटनेचं रिक्रिएशन केलं. तसेच, आरोपी मिहीर आणि राजऋषीची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केल्याची माहिती समोर येत आहे. आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं मिहीरनं स्पष्ट केलं असल्याचं समोर आलं आहे.
पाहा व्हिडीओ : Mihir Shah: माझं करिअर उद्ध्वस्थ, घटनेचा पश्चाताप होतोय : मिहीर शाह
जॅक डॅनिअल्सचा अख्खा खंबा रिचवून मिहीर शहा मित्रमंडळींसोबत बाहेर पडला अन् वरळीत....
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
