एक्स्प्लोर

वरळीत हिट अँड रनची घटना; आदित्य ठाकरे थेट पोलीस स्थानकात, राजकीय रंग न देण्याचं आवाहन

Worli Hit And Run Accident: मुंबईतल्या वरळीतून हिट अँड रन च्या घटनेनं मुंबई हादरली आहे.

Worli Hit And Run Accident: मुंबई मुंबईतील वरळीत (Worli Hit And Run) असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ आज सकाळी हिट अँड रनची घटना घडली. पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन केसने संपूर्ण देशाला हादरा दिला. त्यानंतर आता मुंबईतल्या वरळीतून हिट अँड रन च्या घटनेनं मुंबई हादरली आहे. यात एका महिलेनं तिचे प्राण गमावले आहेत. तर कार चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी कार चालक शिंदे गटाचे (Shinde Group) पालघरमधील उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर शहा असल्याचं समोर आलं आहे. सध्या मिहीर शहा (Mihir Shah) फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेवरुन ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 

सदर घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस स्थानकात जाऊन माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले की, सकाळी वरळीत हिट अँड रनची घटना घडली. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. या घटनेतील चालक फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याला पकडण्याची कारवाई सुरु आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करुन त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मुंबईत गाडी चालवण्याची पद्धत बिघडत चालली आहे. त्यामुळे कडक कारवाई करण्याची गरज आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

राजकीय हस्तक्षेप नको- आदित्य ठाकरे

राजेश शाह कोण आहे, ही तुम्ही माहिती घ्या...मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. कोणी कोणत्याही पक्षात असलं, तरी मी राजकीय वळण देणार नाही. या घटनेत राजकीय हस्तक्षेप नको, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. या भारताचा नागरिक म्हणून आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. 

आदित्य ठाकरेंचं ट्विट-

मुंबईतल्या वाहनचालकांची ड्रायव्हिंगची पद्धत आणि शिस्त ह्यावर आम्ही सातत्याने बोलत आलोय. उलट दिशेने गाड्या चालवणं, सिग्नल न पाळणं, ट्रिपल सीट जाणं... सगळंच मुंबईत वाढत चाललंय जे आधी नव्हतं. पण आता तर हिट ॲंड रन सारखे प्रकार घडायला लागलेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. अपघात करणाऱ्या त्या व्यक्तीला जरी तातडीने अटक करण्यात आली असली, तरी अशा घटना होऊच न देणं गरजेचं आहे. त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन ही परिस्थिती आपल्याला सुधारायला लागेल. मुंबईची वाहतुक शिस्त आणि सुरक्षा परत आणायला लागेल. वाहतुकीचे नियम पाळले जातील, वाहकांना शिस्त लागेल आणि चूका करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल, ह्याची काळजी घ्यावी लागेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

नेमकं काय घडलं? 

अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. 

संबंधित बातमी: 

Worli Heat And Run: वरळी हीट अँड रनमधील BMW वर पक्षाचं चिन्ह; अपघातानंतर खोडण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Embed widget