एक्स्प्लोर

Ram Naik : चंद्रचूड तेव्हा ज्युनिअर होते, आता देशाचे सरन्यायाधीश झाले, पण तारापूर अणुऊर्जा पुनर्वसनाचा खटला 19 वर्षांपासून प्रलंबित; राम नाईक यांची नाराजी

न्यायाच्या मागणीसाठी वर्षानुवर्षे, चकरा मारणाऱ्यांच्या अक्षरशः चपला झिजतात, पिढी बदलते, सुनावणी घेणारे न्यायाधीशही बदलतात पण खटला काही संपत नाही. असाच अनुभव भाजपचे नेते आणि माजी खासदार राम नाईक यांनाही आला आहे.

मुंबई : असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, कारण त्याला मिळते फक्त तारीख. न्यायाच्या मागणीसाठी वर्षानुवर्षे, चकरा मारणाऱ्यांच्या अक्षरशः चपला झिजतात, पिढी बदलते, सुनावणी घेणारे न्यायाधीशही बदलतात पण खटला काही संपत नाही. असाच अनुभव भाजपचे नेते आणि माजी खासदार राम नाईक (Ram Naik) यांनाही आला आहे. न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या कोर्टात एका सुनावणीकरता राम नाईक बुधवारी (6 सप्टेंबर) हायकोर्टात (Bombay High Court) हजर होते.

19 वर्षांच्या न्याय प्रक्रियेवर राम नाईक यांची नाराजी

याचिकाकर्ते या नात्याने राम नाईक यांनी कोर्टाला साकडं घातलं आहे. त्यांनी तब्बल 19 वर्षांच्या न्याय प्रक्रियेवर नाराजीही व्यक्त केली. केस दाखल केली तेव्हा विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदावर नुकतेच नियुक्त झाले होते. आज ते देशाचे सरन्यायाधीश आहेत, त्यांची प्रगती झाली, मग खटल्याची का नाही?, असा सवालही भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी उपस्थित केला.

लवकर निकालापर्यंत जाण्याचं आश्वासन

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पुनर्वसनाबाबतच्या (Tarapur Atomic Power Station) या याचिकेवर हायकोर्टाने 13 ऑक्टोबरला सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे आणि लवकरात लवकर निकालापर्यंत जाऊ हे आश्वासनही दिलं आहे.

राम नाईक काय म्हणाले?

या खटल्याबाबत आणि सुनावणीबाबत बोलताना राम नाईक म्हणाले की, "मी केंद्रात मंत्री असताना तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं माझ्या हस्ते भूमिपूजन झालं होतं.  शेतकरी जमीन सहजासहजी देत नाहीत, पण मी सांगितल्यावर त्यांनी जमीन दिली. जोपर्यंत पुनर्वसन पूर्ण होणार नाही तोपर्यंत वीजेचं काम होणार नाही. परंतु सरकार बदललं, मनमोहन सिंह पंतप्रधान झाले. मी त्यांना भेटून ही अडचण सांगितली, पण त्यांनी ऐकली नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने रीट पिटीशन दाखल केली. त्यात मी वेगळा सहभागी झालो. गेली 19 वर्षे, 2004 पासून आजपर्यंत ही केस चालू आहे. ही केस चालू असताना 87 वेळा सुनावणी झाली, 38 वेगवेगळ्या ऑर्डर्स कोर्टाने दिल्या, पण शेवटचं काम अजून होत नाहीय. आजच्या सुनावणीत मी न्यायमूर्तींना विनंती केली की, ज्यावेळी ही केस फाईल झाली, त्यावेळी इथल्या बेंचचे ज्युनिअर जज होते चंद्रचूडजी. त्यावेळी चंद्रचूड ज्युनिअर होते, नंतर सीनिअर झाले, नंतर उत्तर प्रदेशच्या हायकोर्टाचे न्यायमूर्ती झाले, सुप्रीम कोर्टात न्यायाधीश झाले आणि आता तर सरन्यायाधीश झाले. ते इथपासून इथपर्यंत गेले, पण आमच्या प्रश्नांवर निर्णय झाला नाही. मग चर्चा करुन असा निर्णय झाला की, यामध्ये ज्या पार्टीज आहे, त्यांनी एकत्रित बसून आपले कोणकोणते इश्यूज आहे ते तयार करावे, कशावर एकमत होतं ते सांगावं, इतर इश्यूज वेगळे सांगा. मग 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल. ही केस संपेपर्यंत दुसरी केस घेणार नाही. 13-14 या दोन दिवसात सुनावणी होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलं. पुनवर्सनाची जी कामं आहेत ती कायद्याप्रमाणे झालेली नाही, तो कायदा आणि सरकारने दिलेली आश्वासने याचा विचार करुन जे प्रश्न आहेत, त्यावर निर्णय व्हावा. न्यायाला विलंब होणं हे न्याय न देण्यासारखं आहे.दोन्ही न्यायमूर्ती निर्णय देतील अशी आशा आहे."   

VIDEO : Ram Naik : तारापूर अणूऊर्जा प्रकल्प पुनर्वसनाच्या खटल्याला 19 वर्षांपासून तारीख पे तारीख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget