मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?
म्हाडानं 2030 घरांसाठी अर्ज मागवले होते. मात्र, घरांच्या किंमती पाहता खासगी विकासकांच्या सदनिकांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं.
![मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये? Mhada lottery 2024 Price reduction of 370 houses in MHADA low to high prices come down say minister atul save and new prices in your budget मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/28/f8c0626f6c5d240e76dff7237891b52217248479805451002_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : स्वप्ननगरी मुंबईत घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको मुंबईच्या लॉटरीतील घरांच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे, म्हाडाच्या अर्ज करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. म्हाडाच्या लॉटरीमधील खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 फ्लॅट्सच्या किंमती कमी होणार आहेत. मुंबई मंडळाकडून यंदा 2 हजार 30 घरांच्या लॉटरीची सोडत काढण्यात आली आहे. लॉटरीला मिळालेल्या कमी प्रतिसादानंतर म्हाडाकडून खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यानुसार, 370 घरांच्या किंमती कमी होणार आहेत. राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. तसेच, म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत आता उमेदवारांना म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार आहे.
म्हाडाने (Mhada) यंदाच्या लॉटरीमधील विकास नियंत्रण नियमावली 33(7) आणि 33 (5)मधील 370 घरांना हा निर्णय लागू असणार आहे. त्यामुळे, ब-विकास नियंत्रण नियमावली 33 (5)/(7) व 58 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिकांच्या अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च प्रवर्गातील घरांच्या किंमतीत कपात होणार आहे. या खासगी विकासकांकडून निर्माण झालेल्या घरांच्या किंमतीत कपात होणार असली तरी म्हाडाकडून निर्माण केलेल्या किंमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही. खासगी विकासकांकडून म्हाडाला जुहू, ताडदेव, अंधेरी परिसरासोबतच इतर ठिकाणांवर घरं (Home) विकसित करुन देण्यात आली आहेत, त्याच्या किंमतीत कपात होताना दिसणार आहे. मुंबईतील (Mumbai) जुहू, ताडदेव परिसरात घरांच्या किंमती कोटींच्या घरात आहेत.
म्हाडानं 2030 घरांसाठी अर्ज मागवले होते. मात्र, घरांच्या किंमती पाहता खासगी विकासकांच्या सदनिकांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं. कारण, येथील घरांच्या किंमती कोट्यवधींच्या घरात आहेत. म्हाडाच्या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर होती. त्याला मुदतवाढ देण्यात आल्याने सोडत देखील लांबणीवर जाऊ शकणार आहे. यापूर्वी 13 सप्टेंबर रोजी सोडत काढण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. म्हाडाच्या अपेक्षेप्रमाणं यावेळी सोडतीला मुंबईकरांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र आहे. म्हाडाकडे 22400 अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापैकी 14839 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे. आगामी 9 दिवसांचा कालावधी 50 हजारांचा टप्पा पार होणं अवघड आहे. त्यामुळेच, म्हाडाने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. दरम्यान, म्हाडानं यापूर्वी घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, आता घरांच्या किंमती कमी झाल्या असून अर्ज भरण्यास मुदतवाढही देण्यात आली आहे.
येथील घरांच्या किंमतीत कपात
मध्यम आणि उच्च गटासोबतच अल्प, अत्यल्प गटातील घरांच्या किंमती देखील कमी होणार आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या घरांच्या किंमती कमी करण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. त्यानुसार, विक्रोळी, बोरिवली, सांताक्रुज, मुलुंड, माझगाव, ओशिवारा, चेंबूर, भायखळा, गोरेगाव, वडाळा, दादर, घाटकोपर, कांदिवली परिसरात असलेल्या घरांच्या किंमतीत कपात होत आहे. विकास नियंत्रण नियमावली 33 (5)/(7) आणि 58 अंतर्गत विकासकांकडून म्हाडाला प्राप्त झालेल्या सदनिकांच्या घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
हेही वाचा
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)