(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Who Is Maulana Mufti Salman Azhari : इस्लामिक स्कॉलर, मोटिवेशनल स्पीकर, घाटकोपरमध्ये पकडलेले मौलाना मुफ्ती सलमान कोण आहेत?
Junagadh Hate Speech : आपल्या भडकाऊ भाषणांमुळे चर्चेत आलेले मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केली. जुनागड येथील एका कार्यक्रमात आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना रविवारी मुंबईतून अटक केली. पण आता हे मौलाना मुफ्ती सलमान नेमके आहेत तरी कोण? जाणून घेऊया.
Junagadh Hate Speech : गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुस्लीम धर्मगुरु तसेच इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरींना (Mufti Salman Azhari) रविवारी (4 फेब्रुवारी) गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) घाटकोपरमधून अटक केली. त्यांच्या अटकेनंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचं पहायला मिळालं. हजारोंंच्या जमावाने घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर येऊन गोंधळ घातला. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला, शेवटी मौलानांच्या आवाहनानंतर जमाव शांत झाला.
सलमान मुफ्ती अजहर यांना घाटकोपरमध्ये अटक केल्याची बातमी समजल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर मुफ्ती यांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचं आणि रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं. पण तरीही त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आणि घोषणाबाजी सुरूच ठेवली. गुजरात ATS ने मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक केली, त्यानंतर त्यांना गुजरातला (Gujarat) नेण्यात आलं आहे.
मौलाना मुफ्ती सलमान अजहरी कोण आहेत? (Who is Mufti Salman Azhari?)
मौलाना सममान मुफ्ती अजहर हे सुन्नी धर्मगुरू आहेत. ट्विटर प्रोफाईलनुसार, मौलाना मुफ्ती सलमान अजहरी स्वतःला इस्लामिक रिसर्च स्कॉलर म्हणवतात. त्यांनी इस्लामिक अभ्यासासाठी इजिप्तच्या जामिया अल-अजहर विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
मौलाना सममान मुफ्ती मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत, याशिवाय ते इस्लामिक विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणही देतात. मौलाना मुफ्ती अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय भूमिका बजावताना दिसतात. ते जामिया रियाझुल जन्ना, अल-अमान एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक आहेत. अजहरी अनेकदा आपल्या भडकाऊ भाषणांमुळे चर्चेत असतात.
त्यामुळे पोलिसांनी केली अटक
मौलाना सलमान अजहरी यांनी 31 जानेवारीला गुजरातमधील जुनागड येथील सेक्शन बी भागात एका कार्यक्रमात आक्षेपार्ह भाषण केलं होतं. या भाषणाचा एक व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक आणि मौलानाविरुद्ध भादंवि कलम 153 सी, 502 (2), 188 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल केला, त्या आधारे आयोजक आणि मौलाना या दोघांना अटक करण्यात आली आहे.
'व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी मागितली होती कार्यक्रमाची परवानगी'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्म आणि व्यसनमुक्तीबद्दल जनजागृती करण्यासाठी अजहरी लोकांना संबोधित करणार असल्याचं सांगत आयोजकांनी या कार्यक्रमासाठी मंजुरी मागितली होती. पण त्यांनी भाषणादरम्यान प्रक्षोभक शब्दांचा वापर केला, ज्याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यामुळे आयोजक आणि मौलानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: