एक्स्प्लोर

मुलांच्या उमलत्या वयात अनेक कुटुंबाचा आधार गेला, घाटकोपर दुर्घटनेतील काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर

रिक्षा चालक मोहम्मद अक्रम, टॅक्सी चालक  बशीर अहमद, सतीश वीरबहादुर सिंग, असिक अली शेख, पेट्रोल पंपावर काम करणारे सचिन यादव , पेट्रोल पंपावर काम करणारे  ठाण्याचे ड्रायव्हर  पूर्णेश  जाधव यांच्या  कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबई घाटकोपरमध्ये (Ghatkopar Petrol Pump Hording Collapsed)  झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.  या मृत्यू बनून आलेल्या होर्डिंगनं  कुटुंबाचा आधार  हिरावून घेतलाय. या दुर्घटनेत रिक्षा चालक मोहम्मद अक्रम, टॅक्सी चालक  बशीर अहमद, सतीश वीरबहादुर सिंग, असिक अली शेख, पेट्रोल पंपावर काम करणारे सचिन यादव , पेट्रोल पंपावर काम करणारे  ठाण्याचे ड्रायव्हर  पूर्णेश  जाधव यांच्या  कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घाटकोपरचे रिक्षा चालक  मोहम्मद अक्रम यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

 घाटकोपर दुर्घटनेत रिक्षा चालक मोहम्मद अक्रम या 48  वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या कामराज नगरचे ते रहिवासी होते. त्यांना चार भाऊ आहेत.एक मुलगी आहे.या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब हादरुन गेले आहे. सरकारने त्यांची पत्नी आणि कुटुंबाला मदत करण्याची मागणी कुटुंब करत आहे.

बशीर अहमद सीएनजी भरायला आले अन्...

 वरळीचे रहिवासी असलेले बशीर अहमद असिक आली शेख हे टॅक्सी चालक होते.वरळी वरून टॅक्सी घेऊन घाटकोपरला आले होते. सीएनजी भरण्यास या पंपावर आले आणि ही घटना घडली.  मात्र या घटनेमुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. 

राजेश यादव कामावर आला आणि 10 मिनिटात मोठा अनर्थ घडला... 

 घाटकोपर दुर्घटनेत पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सचिन राजेश यादव या तरुणाचा देखील मृत्यू झाला. सायन कोळीवाडा येथे राहणाऱ्या सचिन यादवचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते आणि त्याला चार महिन्यांचा मुलगा आहे. सचिन हा दीड वर्षांपूर्वी या पेट्रोल पंपावर कामला लागला होता. त्याची शिफ्ट बरोबर चार वाजता बदलली आणि तो कामावर आला.त्याचा नातेवाईक आणि मित्र यांनी दहा मिनिट आधी त्याच्याशी बातचीत ही केली आणि तिथून निघाले आणि ही दुर्घटना घडली. त्याची पत्नी आणि मुलाला लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी त्याचे मित्र कुटुंबीय करत आहेत.
पेट्रोल भरायला आले आणि... 

बाळकृष्ण जाधव पेट्रोल भरायला आले आणि..

ठाण्याच्या बाळकुम विभागात राहणारे ड्रायव्हर पूर्णेश बाळकृष्ण जाधव  हे पेट्रोल भरायला या पेट्रोल पंपावर आले आणि त्यांच्या गाडीवर हे होर्डिंग कोसळले.त्यात त्यांना जबर मार लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. पूर्णेश यांना दोन मुले आहेत जे शिक्षण घेतात. घरकाम करून त्यांची पत्नी कुटुंबाला हातभार लावायची. घरातले कर्ते पुरुष पूर्णेश होते. टुरिस्ट गाड्या चालवून त्यांचे घर ते चालवत होते.मात्र आता त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा मोठा आधार हिरावला आहे.

सतिश सिंग भाडे घेऊन पेट्रोल भरायला आले अन्

टॅक्सी चालक असलेले सतीश सिंग नालासोपारा वरून भाडे घेऊन एलटीटीला आले होते.तिथून सीएनजी गॅस भरण्यासाठी या पंपावर आले आणि तिथे झालेल्या या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तीन मुले आणि एक मुलगी सतीश यांना आहे.घरात मात्र ते एकटे कमवते होते. आता त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामध्ये सरकारने मदत करण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.

दिनेश जैसवार यांच्या मृत्युने कुटुंब हादरले

घाटकोपरमध्ये जिथे हा अपघात झाला त्या इस्टर्न एक्स्प्रेसच्या पलीकडे असलेल्या कामराज नगरमध्ये दिनेश जैसवार आपल्या दोन मुले आणि पत्नीसह भाडे तत्वावर राहत होते. रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होते.घरातली कामे आटपून ते सीएनजी भरण्यास पंपावर जाऊन येतो असे मुलाला सांगून निघाले ते परत आलेच नाही. कुटुंबियांनी त्यांचा शोध पण ते सापडले नाहीत. अखेर त्यांचा मृतदेह राजावाडीमध्ये आणण्यात आल्यावर कुटुंबाला याची माहिती मिळाली. आपले वडील गेल्याच्या धक्क्याने त्यांचे कुटुंब हादरले आहे. दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी ते करीत आहेत.

Video :

हे ही वाचा :

कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वासParali Beed Public Reaction on Polls : राज्यात मतदानाची वेळ संपली, परळीकरांचा कौल कुणाच्या बाजूने?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Embed widget