एक्स्प्लोर

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अंधारात तळपणारी वीज : अमित शाह

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अंधारात तळपणारी वीज असल्याचे गौरवोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काढले. 29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचं उद्घाटन ठाण्यात हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. सावरकर हे बहुआयामी व्यक्तीमत्त्व असल्याचं सांगून अमित शाह म्हणाले की, ''सावरकर हे गद्य आणि पद्य अशा दोन्हीमध्ये श्रेष्ठ होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे येणाऱ्या पिढ्यांना दिशा दाखवण्याचे काम केलं. त्यामुळे त्यांची जे लोक निंदा करतात, त्यांनी एकदा तरी सावरकर वाचवे, म्हणजे त्यांना कळेल.'' अमित शाह यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली. अमित शाह म्हणाले की, ''सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्यांना, भविष्यात पिढ्या कधीच माफ करणार नाहीत. अटलजींच्या नेतृत्वातील भाजप सरकारने अंदमानमध्ये सावरकर ज्योती सुरु केली. पण कर्मदरिद्री यूपीए सरकारने ही ज्योती बंद केली. पुन्हा भाजप सरकार सत्तेत आल्यावर मी स्वत: ही ज्योत पुन्हा प्रज्वलित केली. सावरकरांच्या नावाने सुरु केलेली ही ज्योत नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे.'' सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावी, अशी मागणी या संमेलनाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर अमित शाह म्हणाले की, ''संपूर्ण भारतीयांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी दिली. त्यासाठी कशाचेही काही करावे लागले नाही.'' ''सावरकरांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. ते  केवळ साहित्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांचे विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचे विचार संपूर्ण देशाला कळावेत,'' असं सांगून साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हे साहित्य सम्मेलन केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशातही भरावे, अशी मागणी यावेळी केली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती. सावरकर साहित्य संमेलन हे तीन दिवस चालणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget