एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित पवार आमदारांसह सिद्धिविनायकाच्या चरणी, निवडणुकीत यश मिळू दे; दादांचे बाप्पाला साकडे

Ajit Pawar siddhivinayak Mandir : चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि आज अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे, असे अजित पवार म्हणाले.

मुंबई :  राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election)  आता काही महिन्यातच विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election)  पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार (Sharad Pawar)  गटाची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी  मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं... जनतेचा विश्वास आम्ही पुन्हा जिंकू, सिद्धिविनायकाने आशीर्वाद द्यावा असं साकडं घातल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.  

आम्ही जनतेसमोर त्यांचे आशिर्वाद मागण्यासाठी जात आहोत. सिध्दीविनायकाने आम्हाला आशिर्वाद द्यावेत. शेवटी जनता - जनार्दन सर्वकाही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत.  चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि आज अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे. 14 जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात आज केल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

विधान परिषदेसाठी आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करणार : अजित पवार

अजित पवार म्हणाले,  आज अंगारकीचा अतिशय चांगला दिवस आहे. या दिवशी आपण चांगली सुरुवात करत असतो. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्या कोणत्या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहचवणे आणि पुढे वाटचाल करताना विकासाचा मुद्दा घेऊन वाटचाल करणे आणि हे करताना मुंबईत असल्याने आम्ही सिध्दीविनायकचे दर्शन घेत आहोत. विधान परिषदेच्या नाही तर विधानसभेच्या निमित्ताने तसेच आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रचाराची सुरुवात करत आहे.

विधान परिषदेसाठी आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करणार आहे.  

महायुतीचे पक्ष एकत्र मिळून निर्णय घेतील : अजित पवार

 आपला उमेदवार निवडून येण्याकरता सर्व पक्ष प्रयत्न करतात. सर्वजण या प्रकारचे प्रयत्न  करत आहेत. त्यांनी कोणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न आहे पण सभापतींच्या निवडीच्या दृष्टीने तो निर्णय घ्यायचा आहे.   सरकार म्हणून महायुतीचे पक्ष एकत्र मिळून निर्णय घेतील. 

हे ही वाचा :

अजित पवार अचानक सिद्धिविनायक मंदिरात का गेले? दादांनी केसांचा भांग कसा पाडायचा हेदेखील 'अरोरा' ठरवणार: रोहित पवार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!
Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Mumbai : अजितदादांसोबत काय चर्चा झाली? कराड-धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले?Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines at 1PM 28 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh Jalna : मनोज जरांगेंच्या आंदोलनात धनंजय देशमुख सहभाग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!
Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Esther Anuhya case : इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Embed widget