एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
या सरकारमध्ये आणि आधीच्या नालायक सरकारमध्ये फरक नाही : आदित्य ठाकरे
मुंबई : 2014 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर 'आपलं सरकार' आल्यासारखं वाटलं होतं. मात्र, गेल्या दोन वर्षात हवा तसा बदल न झाल्यानेच आजचा मोर्चा काढला आहे. आधीचं नालायक सरकार आणि या सरकारमध्ये काही फरक वाटत नाही, असा घणाघात शिवसेना-भाजपच्या सरकारवर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
शिक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांसंदर्भात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. त्यानंतर जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
"राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना भेटलो होतो, तेव्हा आश्वासन मिळाले होते की प्रश्न सोडवतो. पण गेल्या दीड वर्षांतला प्रवास हा सुशासन नसून आश्वासन असल्याचे वाटतं आहे. मागण्यांना एटीकेटी लागते की काय असं वाटतंय.", अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर केली.
शिक्षणक्षेत्रातील समस्या मांडत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला सवाल केले आहेत. आदित्य ठाकरेंनी आपल्या सभेत मांडलेले मुद्दे :
- केजीसाठी प्रवेश कायदा कधी येणार, याचे उत्तर हवे आहे.
- पालक आणि विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो, याची गरज नाही.
- नववीत दीड लाख मुलं नापास झाली, ही आताची शिक्षणपद्धती.
- अजून 2 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही.
- MKCL का बंद होत नाही, या मागे कोण आहे?
- या वर्षी ऑनलाईन अॅडमिशनमधून 2 लाख विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळालं नाही. ऑनलाईन अॅडमिशनचं घोडं आणलं कोणी?
- दप्तरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. डिजिटल इंडिया फक्त बोलण्यासाठी आहे. पण शिक्षणात त्याचा वापर का केला जात नाही?
- सरकारला वेळोवेळी प्रश्न विचारला पण उत्तर मिळाले नाही
- आपण डिजिटल इंडिया म्हणतोय, तर शिक्षण खात्याची हेल्पलाईन आणि व्हाट्सअॅप नंबर हवा, वेबसाईटही हवी.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाच्या समस्या मांडत राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवला खरा, मात्र, प्रश्न उपस्थित होतोय की, या सरकारमध्ये शिवसेनेचाही सहभाग आहे. त्यामुळे आपल्याच पक्षाला या समस्या सांगून त्यावर उपाय काढण्याऐवजी अशा प्रकारे मोर्चे योग्य आहेत का, हा मुख्य प्रश्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement