एक्स्प्लोर

Amruta Fadnavis, Priyanka Chaturvedi : अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध; ट्विटरवरील वॉरने वेधलं लक्ष

प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले.

Amruta Fadnavis, Priyanka Chaturvedi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिझायनर अनिक्षाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक ट्वीट शेअर केले. प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी ट्वीट शेअर केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्वीट शेअर केलं. त्यानंतर प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु झाला. दोघींच्या ट्वीटनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. 

प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्वीट

एका न्यूज आर्टिकलचा फोटो शेअर करुन प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'गुन्हेगाराच्या मुलीला उपमुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो आणि ती त्यांच्या पत्नीशी 5 वर्षांहून अधिक काळ मैत्री करते (विधानसभेतील DCM विधानानुसार). ती उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नींना दागिने, घालायला कपडे (प्रमोशनसाठी) देते. तसेच ती त्यांच्यासोबत गाडीमध्ये देखील फिरते.' आणखी एका ट्वीटमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी लिहिलं की, 'महाराष्ट्रात काय चालले आहे श्री नरेंद्र मोदी जी?' प्रियंका चतुर्वेदी यांच्या या ट्वीटला अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला आहे. 

अमृता फडणवीस यांचा रिप्लाय

प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्वीटला अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला, 'मॅडम चतुर-आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी AxisBank ला फायदा मिळवून दिला आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? निश्चितच, तुमचा विश्वास जिंकून, जर कोणी तुमच्याशी संपर्क साधला असता आणि केस बंद करण्यासाठी पैसे दिले असते, तर तुम्ही तुमच्या बॉसद्वारे त्याला मदत केली असती. तीच तुमची औकात आहे.'

प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला, "नशीब, प्रमोशनसाठी डिझायनर कपडे विकत घेण्याची माझी औकात नाहीये. ज्यामुळे नंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. मिस फॅड-नॉइज. मला कळत नाही की स्वतंत्र तपासाच्या मागणीने तुमचा इतका गोंधळ का झाला? प्रामाणिकपणे ज्या दिवशी तिने तुम्हाला पैसे कमावण्याच्या टिप्स दिल्या त्याच दिवशी तुम्ही तिच्या विरोधात तक्रार करायला हवी होती," असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षा अटकेत, बुकी अनिल जयसिंघानी अद्याप फरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Embed widget