मुंबईत जमावबंदी लागू केल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांचं मुंबईकरांना आवाहन
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईत आज मध्य रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आला आहे. या जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना आवाहन केलं आहे.
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मुंबईत 144 कलम लागू राहणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. दरन्यान, अनलॉक गाइडलाइन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे पर्यटनमंत्री आदित्या ठाकरे यांनी आवाहन केलं आहे.
घाबरण्याची गरज नाही : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या आदेशानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना केलं आहे. ते पुढे म्हणाले, की "कलम 144 सीआरपीसी अंतर्गत जारी केलेल्या आदेशात केवळ 31 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या मागील आदेशाचा विस्तार आहे. मुंबई पोलीसांनी कोणतेही नवीन निर्बंध घातले नाहीत", असेही त्यांनी ट्विट केलं आहे.
NO need to PANIC The order issued under section 144 CrPC is only an extension of the previous order issued on 31st August. No new restrictions have been imposed by @MumbaiPolice . Please share and don’t panic. #Section144 #Mumbai
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 17, 2020
संचारबंदीतील ठळक मुद्दे :
- राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच मुंबई शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
- कलम 144 हे मुंबई पोलिसांच्या नित्यक्रमाचा भाग असून नवीन लॉकडाऊन नसल्याचे पोलीस आदेशात सांगण्यात आलं आहे.
- मुंबई शहरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांनी हा आदेश जारी केला आहे.
- जमावबंदी आदेशानुसार चारपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास मज्जाव असतो. त्याचप्रमाणे हत्यारांची ने-आण करण्यासही मनाई असते.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय
सरकारने मिशन बिगीन अगेन सुरु केले. त्यामध्ये सरकारी आणि खाजगी कार्यालये देखील सुरु झाली. सोबतचं काही व्यवसायांना देखील राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शहरात पुन्हा पहिल्यासारखी गर्दी होत आहे. परिणामी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या मुंबई शहरात 1,75,886 लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे.
महत्वाच्या बातम्या :
मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू; विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार
Operation Mask-Up | मुंबईकरांचा बेजबाबदारपणा पाहा, कोरोनाची भीती संपली? मास्कविना फिरतायत मुंबईकर!