![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
गोरेगावच्या उड्डाणपुलावरुन दुचाकी थेट खाली, पुरता चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू
Mumbai Accident : गोरेगावात दुचाकी पुलावरुन कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
![गोरेगावच्या उड्डाणपुलावरुन दुचाकी थेट खाली, पुरता चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू Accident on Mumbai Goregaon flyover two wheeler fall down bike crushed Two died on spot Marathi News गोरेगावच्या उड्डाणपुलावरुन दुचाकी थेट खाली, पुरता चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/82f18aa38bb849d1f7dbb315e1d8fa6d171998060124088_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Goregaon Accident : मुंबई : मुंबईत (Mumbai News) झालेल्या भीषण अपघातानं (Accident News) संपूर्ण शहर हादरलं आहे. मुंबई (Mumbai Accident) उपनगरातील गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरून दुचाकी थेट खाली कोसळली. तब्बल 20 फुट खाली दुचाकी कोसळली. त्यामुळे गाडीचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला होता, तर दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या दोघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात वैभव गमरे आणि आनंद इंगळे यांचा मृत्यू झाला आहे.
गोरेगावात दुचाकी पुलावरुन कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दोघांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दुचाकीच्या अपघातात वैभव गमरे (28) आणि त्याचा मित्र आनंद इंगळे यांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीनं जाताना उड्डाणपुलावरून कोसळून दोघांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. दरम्यान, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)