एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत नाताळच्या मुहूर्तावर उद्यापासून एसी लोकल धावणार
नाताळच्या मुहूर्तावर मुंबईकरांना गारेगार एसी लोकलचा प्रवास करता येणार आहे. बहुचर्चित एसी लोकल उद्या 25 डिसेंबरपासून प्रत्यक्षात धावणार आहे.
मुंबई : मुंबईकरांची एसी लोकलची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण उद्यापासून एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणारआहे.
एसी लोकलची अंतिम चाचणी आज चर्चगेट ते अंधेरी आणि पुन्हा अंधेरी ते चर्चगेट अशा रेल्वेस्थानकांदरम्यान घेण्यात आली.
उद्यापासून दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी पहिली ऐसी लोकल चर्चगेटसाठी रवाना होईल. त्यानंतर चर्चगेट ते विरार या जलद मार्गावर ही लोकल धावेल. दिवसाला 12 फेऱ्या ही लोकल करेल.
शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकलला सुट्टी असेल.
या गाडीचे तिकीट 60 ते 220 रुपये असेल, अशी माहिती मिळते आहे. मात्र याचे निश्चित भाडे अजून जाहीर करण्यात आलेले नाही.
एसी लोकलचे वैशिष्ट्य :
- 110 किमी प्रति तास वेगाने धावेल
- एकूण अंदाजे 6 हजार प्रवासी एका वेळी प्रवास करू शकतील.
- पहिला आणि शेवटचा डबा महिलांसाठी राखीव.
- दुसऱ्या आणि अकराव्या डब्यात 7 आसने वृद्धांसाठी राखीव.
- चौथ्या आणि सातव्या डब्यात 10 आसने अपंग प्रवाशांसाठी राखीव.
- महालक्ष्मी ते बोरीवली अशी एकच धीमी सेवा दिवसाला असेल बाकी जलद फेऱ्या असतील.
- जलद गाडीला मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर आणि वसई रोड ही स्थानके असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement