एक्स्प्लोर

Aarey : आरेतील हिरवळीला संरक्षण प्राप्त, 132 हेक्टर क्षेत्र ग्रीन झोन म्हणून घोषित

Aarey Green Zone : आरे दूध वसाहतीतील 132 हेक्टरचे क्षेत्र म्हणजे जवळपास 326 एकरची जागा नगर विकास खात्याने 'ग्रीन झोन' म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे मुंबईचं फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या आरेतील जंगलाला संरक्षण प्राप्त झाले आहे. 

मुंबई: राज्य सरकारकडून आरे (Aarey) दूध वसाहतीतील 132  हेक्टर क्षेत्र 'ग्रीन झोन' (Aarey Green Zone) म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंबईचं फुफ्फुस मानलं जाणाऱ्या आरेतील हिरवळीला संरक्षण प्राप्त झालं आहे. 2016 साली राज्याने केंद्राला एसजीएनपीच्या आजूबाजूची 165 हेक्टरची जागा इको सेन्सेटिव्ह झोनमधून वगळण्यास सांगितले होते. यातील 33 हेक्टरवर मेट्रो-3 चे कारशेड उभे असलेले पाहायला मिळते. तर उर्वरित 132 हेक्टर जागी आता ग्रीन 
झोन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

आरेतील जंगलासाठी 2019 मध्ये 'महाभारत' होताना दिसलं होतं. अनेक पर्यावरणप्रेमी आरेतील झाडं वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. अशात ठाकरेंच्या शिवसेनेने देखील यात उडी घेत होती आणि हे युद्ध भाजप विरुद्ध शिवसेना रंगलं होतं. ठाकरे सरकारनं आरेतील जवळपास 7058 एकरचा परिसर 'संरक्षित जंगल' घोषित केलं होतं. त्यात आता आरे दूध वसाहतीतील 132 हेक्टरचे क्षेत्र म्हणजे जवळपास 326 एकरची जागा नगर विकास खात्याने 'ग्रीन झोन' म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे मुंबईचं फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या आरेतील जंगलाला संरक्षण प्राप्त झाले आहे. 

आरेतील जवळपास 1 हजार 100 एकर जागेला आता संरक्षण प्राप्त झालंय. मविआच्या काळात 700 एकर आणि महायुती सरकारकडून 326 एकर जागा संरक्षित झाल्याने कोणतंही बांधकाम या परिसरात करता येणार नाही. सोबतच जर हा ग्रीन झोन काढायचा असेल तर त्यासाठी केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याची परवानगी लागणार आहे.

आरे दूध वसाहत निर्माण झाली तेव्हा जवळपास 3 हजार 200 एकर जागा यात आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र यातील अनेक जागा सरकारी कार्यालये तसेच इतर गोष्टींकरीता देण्यात आली. ज्यात मेट्रो कारशेड, फिल्म सिटी, फोर्स वन, महानंद डेअरी आणि राज्य मत्स्यपालन संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे ही जागा कमी होत आता 1 हजार 100 एकरवर आली आहे. अशातच, आता संपूर्ण आरे परिसर ग्रीन झोनखाली आल्याने त्याचा फायदा मुंबईकरांनाच होणार आहे. 

आरेतून प्रवास करताना वाहनधारकांना भरावा लागणार 'ग्रीन टोल'

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेलं आरे हे मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे जंगल आहे. हे जंगल मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखलो जाते याच जंगलामुळे मुंबईतील तापमान नियंत्रणात राहण्यास मदत मिळाली आहे. मात्र या जंगलातून अलीकडे वाहनांची संख्या अधिक वाढली असून वायू प्रदूषणात (Air Pollution) मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आरेतून जाणाऱ्या वाहनांवर लवकरच आता ‘ग्रीन’ टोल  आकारण्यात येणार आहे.  वनविभाग आरेच्या जंगलातून प्रवास करणाऱ्या वाहनांवर टोल लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget