एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दीपिका पदुकोण राहात असलेल्या इमारतीला भीषण आग
प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील ब्यूमॉन्ट इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 33 व्या मजल्याला ही आग लागली आहे.
मुंबई: प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील बो मोंड इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 33 व्या मजल्याला ही आग लागली आहे. आगीची तीव्रता पाहून अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. सध्या आग विझवण्याचं काम सुरु आहे.
ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अग्निशमनदलाला या आगीची माहिती दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी मिळाली.
याच इमारतीत अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचं घर आणि ऑफिसही असल्याची माहिती मिळते. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचकेचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2010 मध्ये 16 कोटी रुपयांत खरेदी केला होता.
दरम्यान, दीपिकाने ट्वीट करुन आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. त्याशिवाय आगीशी लढणाऱ्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही तिने केलं आहे.
याशिवाय अनेक उद्योजकांची कार्यालयंही या इमारतीत आहे. फायर ब्रिगेडच्या शिड्या तोकड्या बो मोंड इमारतीच्या 33 व्या मजल्याला आग लागली असली, तरी फायर ब्रिगेडकडे तेवढ्या उंचीची शिडीच उपलब्ध नाही. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, या इमारतीतून जवळपास 100 जणांची सुखरुप सुटका केली आहे. 6 फायर इंजिन, 5 जंबो टँकर आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल आहेत.I am safe.Thank You everyone.Let us pray for our firefighters who are at site risking their lives...🙏🏽
— Deepika Padukone (@deepikapadukone) June 13, 2018
विझता विझता आग पुन्हा भडकली मुंबईतील प्रभादेवी परिसराच्या बो मोंड या इमारतीला लागलेली आग विझत आली होती मात्र पाचच मिनिटात ती पुन्हा भडकली. इमारतीच्या 32 आणि 33 व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. अग्नीशमन दलाच्या १० गाड्या आणि ३ वॉटर टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आली. मात्र वाऱ्यामुळे पुन्हा आग भडकली. सध्या इथं धुराचं साम्राज्य परसलंय. इमारतीतील 90 लोकांना सुरक्षीतरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. या इमारतीमध्ये बडे उद्योगपती आणि नोकरशाह राहत असल्याची माहिती मिळतेय. मोठ्या इमारतीला ही आग लागली असल्यानं सी लिंकवरुनही ही आग पाहायला मिळत आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. संबंधित बातम्या 2776 स्क्वे फूट एरिया, 4 बीएचके, कसा आहे दीपिकाचा भव्य फ्लॅट?#मुंबई - प्रभादेवीतील ब्यूमॉन्ट इमारतीला आग, 33 व्या मजल्यावर भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचं काम सुरु pic.twitter.com/8pbXZjtsFq
— ABP माझा (@abpmajhatv) June 13, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement