मुंबईत भर वस्तीत विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू
मुंबईत विमान कोसळलं: घाटकोपरमधील सर्वोदय दवाखान्याजवळ चार्टर्ड विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
VIDEO : घाटकोपरमध्ये चार्टर्ड प्लेन कोसळलं! pic.twitter.com/oTnlgeWnVa
— ABP माझा (@abpmajhatv) June 28, 2018
उत्तर प्रदेशने विमान विकलं
हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. मात्र या विमानाला अलाहाबादमध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान मुंबईतील यूवाय एव्हिएशनला विकलं होतं. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का हे तपासण्यासाठी आजची चाचणी घेण्यात येत होती.
जुहूवरुन उड्डाण
चाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरुन या विमानाने उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झालं आणि भर वस्तीत कोसळलं. या अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे.
अपघातापूर्वी वैमानिक आणि कंट्रोल रुमचा काय संभाषण झालं हे ब्लॅक बॉक्समुळे समजेल. त्यावरुन हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकेल.
घाटकोपरमध्ये नेमकं काय झालं? 1.00 वा. दुपारी एकच्या सुमारास जुहूवरुन उड्डाण दुपारी 1 वा 10 मिनिटांच्या सुमारास घाटकोपरमध्ये विमान कोसळलं 1.16 वा. अग्निशमन दलाला पहिला कॉल 1.37 वा. अग्निशमन दल घाटकोपरमध्ये घटनास्थळी दाखल 1.39 वा. लेव्हल वन आगीची सूचना 1.40 वा. आगीवर ताबा तीन फायर इंजिन आणि 1 जंबो वॉटर टँकर घटनास्थळी विमान नेमकं कसं होतं? अपघातग्रस्त विमान - किंग एअर सी-90 विमान UY एव्हिएशन कंपनीचं चार्टर्ड प्लेन या विमानाची प्रवासी क्षमता 12 या विमानात चार जण होते. त्यापैकी दोन महिला होत्या. एक पायलट आणि एक तंत्रज्ञLIVE UPDATE
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत 1 ते 2 दरम्यान जेवणाची सुट्टी होती, कामगारांच्या अनुपस्थितीमुळे मोठा अनर्थ टळला
2. 45 विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
अलाहाबादमध्ये विमानाचा अपघात झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने विमानाची विक्री केली, मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनला विमान विकल्याची प्रधान सचिव अवनीश अवस्थी यांची माहिती
जुहू हेलिपॅडवरुन टेस्टिंगसाठी उड्डाण केल्यानंतर हे विमान घाटकोपरमध्ये कोसळलं
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु, मलबा हटवून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु
विमान कोसळल्याने परिसरात मोठं नुकसान
विमान आपल्या मालकीचं नसल्याचा उत्तर प्रदेश सरकारचा दावा
पोलिसांकडून परिसर रिकामा करण्यास सुरुवात, रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं
आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न