एक्स्प्लोर
विलेपार्ले परिसरातून 80 कोटींचं ड्रग्ज जप्त
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे गावाजवळ असलेल्या केमिकल फॅक्टरीत ड्रग्ज बनवलं जात असल्याच समजल्यावर महाराष्ट्र ए टी एस ने केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले परिसरातून तब्बल 80 कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे. म्याऊ म्याऊ नावानं ओळखलं जाणारं अर्थात एमडी ड्रग्जचा 200 किलोचा साठी एका फॅक्टरीमधून जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान या ड्रग्जचं पुणे कनेक्शन देखील समोर आलं आहे. पुण्यातल्या एका कंपनीत हे एमडी ड्रग्ज तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे गावाजवळ असलेल्या केमिकल फॅक्टरीत ड्रग्ज बनवलं जात असल्याच समजल्यावर महाराष्ट्र ए टी एस ने केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रॉनची किंमत जवळपास दहा कोटी रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणी महेंद्र परशुराम पाटील आणि संतोष बाळासाहेब आडके या दोघांना अटक केली आहे.
Alandi | आळंदीमध्ये महाराजांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, तब्बल सात दिवस विद्यार्थी कोमामध्ये
दिवे गावाजवळ असलेल्या श्री अल्फा केमिकल्स या कंपनीत संतोष आडके हा मेफेड्रॉन तयार करायचा आणि मुंबईत त्याची विक्री केली जायची. पोलिसांनी आधी मुंबईतील विले पार्लेमध्ये मेफेड्रॉन जप्त केलं. चौकशीत हे मेफेड्रॉन दिवे गावाजवळ तयार केलं जातं असल्याचं समजल्यावर पोलिसांनी श्री अल्फा केमिकल या कंपनीवर छापा मारला.
मुंबई एटीएसने मारलेल्या छाप्यात पोलिसांनी 1.2 कोटीचे मॅन्युफॅक्चरींग युनिट देखील जप्त केले आहे. सध्या पोलीसांनी संपूर्ण फॅक्टरीला जप्त केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. आगामी काळात देखील अटक होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
'शीना बोरा प्रकरणी देवेन भारती यांनी माहिती दडवून ठेवली', राकेश मारियांचा आरोप, काय आहे खाकीतलं राजकारण?
सुपर कॉप राकेश मारिया यांच्या पुस्तकाने खळबळ, खाकीतलं राजकारण समोर!
रेल्वेत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने कबड्डी खेळाडूंची फसवणूक, आरोपीला अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
