एक्स्प्लोर

'शीना बोरा प्रकरणी देवेन भारती यांनी माहिती दडवून ठेवली', राकेश मारियांचा आरोप, काय आहे खाकीतलं राजकारण?

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. तत्कालीन सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी शीना बोरा हत्याकांडाशी संबंधित आरोपी पीटर, इंद्राणी मुखर्जी यांच्याबाबत महत्त्वाची माहिती लपवल्याचा आरोप राकेश मारिया यांनी केला आहे. ‘लेट मी से इट नाऊ’ या पुस्तकातील एका प्रकरणात मारियांनी हा आरोप केला आहे. तर मारियांनी केलेले आरोप देवेन भारती यांनी फेटाळले आहेत.

मुंबई : एखादं आत्मचरित्रावर आधारीत पुस्तक प्रकाशित होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात सापडणं काही नवीन गोष्ट नाही. अशा पुस्तकांतील बऱ्याचदा असेच मजकूर जाहीर केले जातात ज्यावरून चर्चा होईल. सहाजिकच याचा परिणाम पुस्तकाच्या विक्रीवर होत असतो. मुंबई पोलीस आणि गुन्हेगारी जगतावर आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. मात्र 90 च्या दशकांत बाबरीच्या पतनानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली, त्यानंतरचे साखळी बॉम्बस्फोट, त्यांचा रोमहर्षक तपास, 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला, गुरूनाथ मयप्पनचं आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण ते अलिकडच्या काळातील शीना बोरा हत्याकांड असा सारा प्रवास आता एकाच पुस्तकात उपलब्ध झाला आहे. मुंबई पोलीस दलात एकेकाळी 'सुपरकॉप' अशी ओळख असलेल्या राकेश मारिया यांचं 'लेट मी से इट नाऊ' हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. मात्र या पुस्तकात त्यांनी शीना बोरा प्रकरणावरून पोलीस दलातील आपल्याच सहाकाऱ्यांवर केलेल्या आरोपांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात शीना बोरा हत्याकांड संदर्भात म्हटलंय की, पीटर मुखर्जीनं शीना गायब झाल्याची माहिती देवेन भारती यांना दिली होती. मात्र भारती यांनी ही माहिती आपल्यापासून दडवून ठेवली. याबाबत आपण त्यांना विचारलं असताही त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. त्यामुळे कदाचित तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत चुकीची माहिती गेल्याचा आरोप मारिया यांनी केला आहे. त्याचबरोबर अहमद जावेद यांनीही एका ईदच्या कार्यक्रमाला पीटर मुखर्जीला आमंत्रित केलं होतं. त्याकडे मात्र कुणीही लक्ष दिलं नाही, असाही दावा त्यांनी या पुस्तकात केला आहे. शीना बोरा प्रकरणात उगाच जातीनं लक्ष घालून राकेश मारिया मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होऊ लागल्यानं राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

सुपर कॉप राकेश मारिया यांच्या पुस्तकाने खळबळ, खाकीतलं राजकारण समोर!

 पुस्तकातून या गोष्टी प्रकाशित होताच त्यावर संबंधित व्यक्तींच्या प्रतिक्रिया येणंही स्वाभाविकच होतं. देवेन भारती यांनी स्पष्ट केलंय की, "बॉलिवूडशी संबंधित कुटुंबाशी मारिया यांचा जवळचा संबंध असल्यामुळेच कदाचित पटकथा लेखनाचा हा प्रभाव असावा. वस्तुस्थितीपेक्षा प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी विपणनासाठी हे केले असावे. तथापि एक पोलीस अधिकारी म्हणून काल्पनिकतेपेक्षा आरोपपत्र आणि केस डायरी वाचायला हवी होती. खटला सुरू असल्याने अधिक भाष्य करणे योग्य नाही. तपास पथकाला तपशिलाची संपूर्ण माहिती आहे. मुंबई पोलिसांकडे तपास होता तेव्हा वस्तुस्थिती तशीच होती".
शीना बोरा प्रकरणी देवेन भारती यांनी माहिती दडवून ठेवली', राकेश मारियांचा आरोप, काय आहे खाकीतलं राजकारण?
ज्या के.पी बक्षी यांनी राकेश मारिया यांच्या बदलेचे आदेश काढले होते, त्यांनी 'एबीपी माझा'कडे प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "कोणत्याही अधिकाऱ्याला बदलीनंतर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. आपल्याला अजून थोडा कालावधी मिळायला हवा होता असं प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला वाटत असतं, त्यात गैर असं काहीच नाही. मात्र प्रशासनाची आपली काही कारणं असतात, शेवटी कोणताही निर्णय विनाकारण तर होत नसतो". असं सूचक विधान त्यांनी केलं.

शीना बोरा हत्याकांड प्रकरण; पीटर मुखर्जीला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

अहमद जावेद यांनी मात्र मारिया यांच्या आरोपांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "प्रत्येक गोष्टीला एक कायदेशीर प्रक्रिया असते, त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी कुणाकडे होती हे सहज तपासता येईल. अश्याप्रकारची विधान करण्याआधी त्यांनी किमान सत्यता तपासायला हवी होती. हे गोष्ट खरंच खेदजनक आहे, मात्र अश्यावेळी तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार."
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र राकेश मारिया यांच्या या पुस्तकानं पोलीस प्रशासनात मात्र दिसतं तसं सारं काही आलबेलं नसतं हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.
(ऋत्विक भालेकर आणि गणेश ठाकूरसह अमेय राणे) 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Alert: संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र ते मुसळधार पावसाचे अलर्ट,  कुठे रेड कुठे ऑरेंज? IMD चा संपूर्ण हवामान अंदाज
संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र ते मुसळधार पावसाचे अलर्ट, कुठे रेड कुठे ऑरेंज? IMD चा संपूर्ण हवामान अंदाज
Pune Metro: स्वारगेट भुयारी मेट्रो मार्ग पुणेकरांसाठी होणार खुला; मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये
स्वारगेट भुयारी मेट्रो मार्ग पुणेकरांसाठी होणार खुला; मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये
Arvind Kejriwal: मोदीजी 75 वर्षांचे झाल्यावर त्यांना रिटायर करणार का? केजरीवालांनी मोहन भागवतांना पाठवलेल्या पत्राची जोरदार चर्चा
अजित पवारांचा उल्लेख करत अरविंद केजरीवालांनी मोहन भागवतांना कोंडीत पकडलं, म्हणाले...
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर संशयाच्या भोवऱ्यात; हैदराबाद गँगरेपमधील 4 आरोपींचे एन्काऊंटर करणाऱ्या 'त्या' 10 पोलिसांचं काय झालं?
अक्षय शिंदे एन्काऊंटर संशयाच्या भोवऱ्यात; हैदराबाद गँगरेपमधील 4 आरोपींचे एन्काऊंटर करणाऱ्या 'त्या' 10 पोलिसांचं काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Called Off : मनोज जरांगे यांचं आंदोलन स्थगित, पाच वाजता उपोषण सोडणारदिव्यांगांसाठी बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक, आकाशवाणी 'आमदार निवास'वर कार्यकर्ते चढल्याची माहितीChandrashekhar Bawankule : महसूल विभागाची शिफारस होती, मंत्री विखे-पाटलांचं स्पष्टीकरणAmit Shah in Nashik : नाशकात मुसळधार, हायवेवर पाणी; अमित शाहांचा ताफा कडेकडेने गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert: संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र ते मुसळधार पावसाचे अलर्ट,  कुठे रेड कुठे ऑरेंज? IMD चा संपूर्ण हवामान अंदाज
संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र ते मुसळधार पावसाचे अलर्ट, कुठे रेड कुठे ऑरेंज? IMD चा संपूर्ण हवामान अंदाज
Pune Metro: स्वारगेट भुयारी मेट्रो मार्ग पुणेकरांसाठी होणार खुला; मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये
स्वारगेट भुयारी मेट्रो मार्ग पुणेकरांसाठी होणार खुला; मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये
Arvind Kejriwal: मोदीजी 75 वर्षांचे झाल्यावर त्यांना रिटायर करणार का? केजरीवालांनी मोहन भागवतांना पाठवलेल्या पत्राची जोरदार चर्चा
अजित पवारांचा उल्लेख करत अरविंद केजरीवालांनी मोहन भागवतांना कोंडीत पकडलं, म्हणाले...
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर संशयाच्या भोवऱ्यात; हैदराबाद गँगरेपमधील 4 आरोपींचे एन्काऊंटर करणाऱ्या 'त्या' 10 पोलिसांचं काय झालं?
अक्षय शिंदे एन्काऊंटर संशयाच्या भोवऱ्यात; हैदराबाद गँगरेपमधील 4 आरोपींचे एन्काऊंटर करणाऱ्या 'त्या' 10 पोलिसांचं काय झालं?
Sharad Pawar: शरद पवार परळीत मोठी सभा घेणार, धनंजय मुंडेंना हादरा देणार; पक्षप्रवेशावेळी सगळंच काढलं
शरद पवार परळीत मोठी सभा घेणार, धनंजय मुंडेंना हादरा देणार; पक्षप्रवेशावेळी सगळंच काढलं
Ajit Pawar : पुण्यातील जागावर महायुतीत पेच? समर्थकांकडून थेट अजित पवारांची कोंडी, जागा न मिळाल्यास दिला मोठा इशारा
पुण्यातील जागावर महायुतीत पेच? समर्थकांकडून थेट अजित पवारांची कोंडी, जागा न मिळाल्यास दिला मोठा इशारा
घरबसल्या काढा दाखले; सरकारी दफ्तरची झंटट नको, महा-ई-ग्राम ॲप करा डाऊनलोड
घरबसल्या काढा दाखले; सरकारी दफ्तरची झंटट नको, महा-ई-ग्राम ॲप करा डाऊनलोड
Uddhav Thackeray : बाजारबुणगे म्हणतात उद्धव ठाकरेंना खतम करा, पवारसाहेबांना खतम करा; हिंमत असेल तर येऊन तर बघ, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
बाजारबुणगे नागपूरला येऊन गेले, त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचाय, उद्धव ठाकरेंकडून नाव न घेता अमित शाहांवर हल्लाबोल
Embed widget