एक्स्प्लोर

सुपर कॉप राकेश मारिया यांच्या पुस्तकाने खळबळ, खाकीतलं राजकारण समोर!

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मकथेत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तत्कालिन सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी या हत्याकांडाशी संबंधीत आरोपी पीटर, इंद्राणी मुखर्जी यांच्याबाबत महत्त्वाची माहिती लपवल्याचा आरोप राकेश मारिया यांनी केला आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सुपर कॉप राकेश मारिया यांच्या आत्मकथेने मुंबई पोलीस दलापासून महाराष्ट्र सरकारमध्ये भूकंप घडवला आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांची ' Rakesh Maria - let me say it now'  हे पुस्तक अद्याप लोकांच्या हातातही आलेलं नाही, पण सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. खरंतर राकेश मारिया यांनी या आत्मकथेत असे खुलासे केले आहेत, जे खाकी वर्दी परिधान करुन ते कधीही बोलू शकले नाहीत. शिवाय राकेश मारियांनी दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. 26/11 दहशतवादी हल्ल्यापासून पोलीस विभागात राजकीय हस्तक्षेपाबाबत राकेश मारिया यांनी आपले अनुभव लिहिले आहेत. शीना बोरा हत्याकांड आणि राजकीय हस्तक्षेप राकेश मारिया यांनी बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात मुंबई पोलीस दलातील सहकारी असलेले तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राकेश मारिया यांचं म्हणणं आहे की, "देवेन भारती यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्याबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली." राकेश मारिया यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, "शीना बोरा बेपत्ता झाल्याबाबत मी जेव्हा पीटर मुखर्जीला विचारलं तेव्हा पीटरने आपण याबाबतची माहिती देवेन भारती यांना दिली होती, असं सांगितलं होतं. शीना बेपत्ता झाल्यासंदर्भात तक्रार किंवा आकस्मिक मृत्यूची नोंद का झाली नाही याबद्दल जेव्हा चर्चा केली तेव्हा देवेन भारती गप्प बसले. यानंतर मी देवेन भारती यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं." पुस्तकाची विक्री आणि वेब सीरिज बनवण्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी देवेन भारती यांनी मात्र राकेश मारियांचे आरोप फेटाळले आहेत. "राकेश मारिया अशा कुटुंबांशी संलग्न आहेत, ज्याचा संबंध बॉलिवूडशी आहे. त्यामुळे त्यांच्यावर पटकथा लेखनाचा प्रभाव असावा. पुस्तकाची विक्री आणि वेब सीरिज बनवण्याची ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे," असा आरोप देवेन भारती यांनी केला आहे. माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यावर निशाणा गृहसचिवांनी मेसेजच्या माध्यमातून माझी तात्काळ बदली केल्याचं राकेश मारिया यांनी आत्मकथेत पुढे लिहिलं आहे."माझ्यानंतर अहमद जावेद यांना पोलीस आयुक्तपदी नेण्यात आलं. अहमद जावेद आणि शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी यांची चांगली मैत्री होती. अहमद जावेद आपल्या घरातील ईदच्या पार्टीसाठी पीटर मुखर्जीला बोलावत असत. त्यामुळे शीना बोरा हत्याकांड प्रकरणावर परिणाम होणारच," असा दावा राकेश मारिया यांनी पुस्तकात केला आहे. सुपर कॉप राकेश मारिया यांच्या पुस्तकाने खळबळ, खाकीतलं राजकारण समोर! राकेश मारियांकडून आणखी काय अपेक्षा करणार? : अहमद जावेद राकेश मारिया यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना अहमद जावेद म्हणाले की, "राकेश मारिया यांचे आरोप बिनबुडाचे आणि आश्चर्यकारक आहेत. यामध्ये त्रुटी, चुकीची माहिती, अतिशय वाईट तथ्य आहेत, जे दिशाभूल करणारे आहेत. अधिकृत माहितीवरुनच याला दुजोरा मिळू शकतो." "इतकंच काय तर राकेश मारिया यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार," असंही अहमद जावेद म्हणाले. 26/11 दहशतवाद्यांना हिंदू दाखवण्याचा पाकिस्तानचा डाव राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जिवंत अटक केलेला एकमेव दहशतवादी अजमल आमीर कसाब याच्याबद्दलही मोठा गौप्यस्फोट केला आहे. राकेश मारियांनी दावा केला आहे की, "पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने 26/11 हल्ला हा हिंदू दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 10 हल्लेखोरांना हिंदू सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत बनावट ओळखपत्रे पाठवली होती. कसाबकडेही एक ओळखपत्र मिळालं होतं, त्यावर समीर चौधरी असं नाव लिहिलं होतं. समीर चौधरीच्या घराचा पत्ता बंगळुरु लिहिला होता, तर तो हैदराबादच्या दिलकुशनगरमधील एका कॉलेजचा विद्यार्थी असल्याचा उल्लेख त्यावर होता. हल्ल्याच्या रात्री मुंबई पोलिसांचं पथक तपासाठी बंगळुरुलाही रवाना झालं होतं." "कसाबशी संबंधित माहिती गोपनीय ठेवणं मोठं आव्हान होतं. पोलिसांना कसाबचा फोटो किंवा अधिक माहिती जारी करायचीच नव्हती. मीडियाला त्याची माहिती मिळू नये, असा प्रयत्न पोलिसांनी केला होता.  खटल्याच्या वेळीही पाकिस्तानचा मुखवटा फाटत होता, त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगला कसाबला मारण्याची सुपारी मिळाली होती," असा दावाही मारिया यांनी केला. "कसाबला जिवंत ठेवणं माझी प्राथमिकता होती. सामान्यांपासून मुंबई पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये कसाबविषयी राग होता. पाकिस्तान आणि अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबा कसाबला मारण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत होते. कारण मुंबई हल्ल्याचा तो सर्वात मोठा आणि एकमेव पुरावा होता," असं राकेश मारिया यांनी आपल्या आत्मकथेत लिहिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget