एक्स्प्लोर
Advertisement
मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी आरोपींची जामिनासाठी हायकोर्टात याचिका, 24 एप्रिलला सुनावणी
भायखळ्याच्या महिला तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यूप्रकरणात आरोपी असलेल्या जेल अधिक्षक मनिषा पोखरकरसह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा आरोपींनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : भायखळ्याच्या महिला तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यूप्रकरणात आरोपी असलेल्या जेल अधिक्षक मनिषा पोखरकरसह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा आरोपींनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर 24 एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
24 जून 2017 रोजी मंजुळा शेट्येला भायखळा कारागृहातील सदर महिला अधिकाऱ्यांनी किरकोळ कारणावरून आमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत मंजुळा शेट्येचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी या सहाही महिला अधिकारी अटकेत असून यांच्याविरोधात सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. दरम्यान सत्र न्यायालयाने जामीनासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे.
मंजुळा शेट्ये या वॉर्डनकडून काही अंडी आणि पावांचा हिशेब न मिळाल्याने तिला नग्न करुन अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. जेल प्रशासनाने सुरवातीला हे प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. परंतु कारागृहातील कैद्यांनी याविरोधात आवाज उठविल्यानंतर हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement