एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज मध्य आणि आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
मुंबईत आज (23 जुलै) मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड या धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी-वांद्रे या दोन्ही मार्गांवर ११ ते दुपारी साडे चार पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मुंबई : मुंबईत आज मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड या धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी-वांद्रे या दोन्ही मार्गांवर ११ ते दुपारी साडे चार पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड स्थानका दरम्यान स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे माटुंगा स्थानकातून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील स्लो सेवा सकाळी 11.12 ते दु. 4.27 या काळात माटुंगा आणि मुलुंडमध्ये डाऊन फास्ट मार्गावर चालतील. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर या गाड्या मुलुंडहून पुन्हा डाऊन स्लोवर चालवल्या जातील.
तर ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप फास्ट लोकल स. 11.22 ते दु. 3.28 पर्यंत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबतील. सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व डाऊन फास्ट लोकल स. 10.48 ते दु. 2.45 या कालावधीत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबतील.
दुसरीकडे हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रेपर्यंत सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 आणि वांद्रे-चुनाभट्टी ते सीएसएमटीपर्यंत सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. यामुळे सीएसएमटीहून सुटणाऱ्या पनवेल आणि अंधेरीला जाणाऱ्या लोकल फेऱ्या बंद राहतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement