एक्स्प्लोर
पीएमसी बँक खातेधारकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
आरबीआयनं पीएमसी बँकेवर लावलेले आर्थिक निर्बंध हटवण्यास हायकोर्टाने नकार दिला. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी काहींनी सर्वसामान्य याचिकाकर्त्यांना उगाच खोट्या आशा दाखवत कोर्टाकडे आणलं. मुळात बँकेशी संबंधित प्रकरणात दाद मागताना तुम्ही चुकीचे दरवाजे निवडलेत. आरबीआयचे कायदे आणि नियम स्पष्ट आहेत, त्यामुळे त्यात ढवळाढवळ करत कायद्यानं आम्ही तुम्हाला कोणताही दिलासा देऊ शकत नाही.

मुंबई : पीएमसी बँक खातेधारकांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. पंजाब अँड महाराष्ट्र कॉ.ऑ. बँकेच्या खातेधारकांनी आरबीआय विरोधात दाखल केलेल्या सर्व याचिका हायकोर्टानं फेटाळून लावल्या आहेत. भारतीय बँकांशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार केवळ आरबीआयलाच आहेत तेच या क्षेत्रातील सार्वभौम आहेत, असं स्पष्ट करत आरबीआयनं पीएमसी बँकेवर लावलेले आर्थिक निर्बंध हटवण्यास हायकोर्टाने नकार दिला. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी काहींनी सर्वसामान्य याचिकाकर्त्यांना उगाच खोट्या आशा दाखवत कोर्टाकडे आणलं. मुळात बँकेशी संबंधित प्रकरणात दाद मागताना तुम्ही चुकीचे दरवाजे निवडलेत. आरबीआयचे कायदे आणि नियम स्पष्ट आहेत, त्यामुळे त्यात ढवळाढवळ करत कायद्यानं आम्ही तुम्हाला कोणताही दिलासा देऊ शकत नाही. असं न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. याचिकाकर्त्यांच्यावतीनं अॅड. सतीश तळेकर आणि अॅड. गायत्री सिंह यांनी प्रमुख युक्तिवाद केला तर आरबीआयतर्फे अॅड. व्यंकटेश धोंड यांनी बाजू मांडली.
दरम्यान गुरूवारच्या सुनावणीत आरबीआयनं आपला युक्तिवाद करताना स्पष्ट केलं की, सुरूवातीच्या चाचपणीत बँकेतील २९ टक्के रक्कम गायब झाल्याचं लक्षात आलं. तेव्हाच आरबीआयनं यात हस्तक्षेप केला. खोलवर चौकशी करताच स्पष्ट झालं की खोटी लोन खाती तयार करून बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी संगनंमतानं पीएमसी बँकेतील खातेधारकांचा एकूण 46 टक्के पैसा गायब केला आहे. जर आरबीआयनं बँकेचा ताबा घेतला नसता तर खातेदार अधिक संकटात सापडले असते. बँकेवर आर्थिक निर्बंध लावल्यानंतरही आरबीआयनं खातेधारकांच्या हिताचा विचार करता टप्याटप्यानं बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवत नेली. तसेच लवकरच याही मर्यादा शिथिल करण्याचा प्रयत्न आरबीआय करत आहे. तेव्हा आरबीआय या सर्वाला जबाबदार आहे असा खातेदारांचा आरोप बिनबुडाचा आहे, असं आरबीआयनं स्पष्ट केलं.
रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लावले आहेत. एचडीआयएल या कंपनीला गैरप्रकारे कर्ज दिल्यामुळे पीएमसी बँक आर्थिक नुकसानीत आली. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य खातेदारांच्या पैसे काढण्यावरही बंधने लावण्यात आलेली आहेत. याविरोधात तीन स्वतंत्र याचिकांद्वारे हायकोर्टात संबंधित बंधने हटविण्याची मागणी करण्यात आली होती. बँकेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गैरप्रकारांची आणि हाऊसिंग डेव्हलपमेंट ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल)ला दिलेल्या रकमेची माहिती होती असे तपासात उघड होत आहे. बनावट खात्यांद्वारे ही रक्कम वळविण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार एकापाठोपाठ एक आरोपींचं अटकसत्रही सुरूच आहे.
संबंधित बातम्या
PMC Bank | पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन होणार? | ABP Majha
Neerav Modi | पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदी फरार म्हणून घोषित | ABP Majha
आरबीआयने पैसे बुडवले नाहीत, पीएमसी खातेधारकांचे अधिक नुकसान होण्यापासून
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी तीन माजी संचालकांना अटक, आरोपींची संख्या 12 वर
PMC Bank | पीएमसी खातेधारकांना दिलासा! बँक खात्यातून संपूर्ण पैसे काढता येणार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
