मुंबईकरांना गुडन्यूज! मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार, प्रवास हायस्पीड; सिडकोचा मोठा निर्णय
Mumbai Airport : मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार असल्या माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी, या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरुपाचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली होती. अशातच मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार असल्या माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.
वर्षाला 9 करोड प्रवाशी विमानतळाचा वापर करणार असल्याचा अंदाज
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट जोडल्या जाणार आहे. मुंबईतील समुद्र आणि खाड्यांचा वापर करून जल वाहतूकीने विमानतळ जोडणार आहे. त्यामुळे वर्षाला 9 करोड प्रवाशी या विमानतळाचा वापर करणार असल्याचा अंदाज आहे. मुंबई विमानतळावर एक रनवे, मात्र नवी मुंबई विमानतळावर दोन रन वे असल्याने दुप्पट क्षमता आहे. विमानतळावर चार टर्मिनल असून चारही टर्मिनल आंतर्गत जोडणार. जेणेकरून कोणत्याही टर्मिनलमधून आत आलेला प्रवाशी इच्छित ठिकाणी पोचणार. हल्ली मुंबई विमानतळावर बाहेर जावून खाजगी वाहणं पकडून दुसऱ्या टर्मिनल वर जावे लागत असल्याने भविष्यात ही समस्या दूर होणार आहे. किंबहुना यात सोलरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार असल्याची माहिती ही विजय सिंघल यांनी दिली.
नवी मुंबई विमानतळावर पहिल्या विमानाचे लँडींग
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या विमानाचे लँडींग झाले. यावेळी, विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आणि जल्लोष करत आनंद व्यक्त केला.विमानाच्या लँडींगवेळी, अग्निशमन दलाकडून पहिल्या विमानास वॉटर सलामीही देण्यात आली. त्यामुळे, नवी मुंबईसह मुंबईकरांना या विमानसेवेचा वेगळाच आनंद आहे.मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेलं हे विमानतळ पुढील वर्षी म्हणजेच मार्च 2025 रोजी सुरू होणार असल्याचे समजते.येथील विमानतळावर आज 29 डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो A-320 चं यशस्वी लँडिंग करण्यात आलं.
महिनाभरापूर्वी वायुदलाच्या सी 295 आणि सुखोई 30 या विमानांचे येथे लँडींग झाले होते, या विमानांचे लँडींग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे.हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवीन मुंबईतील विमानतळ हे दुसरे देशातील सर्वात मोठं विमानतळ आहे. जवळपास 5,945 एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. मुंबईपासून 40 किमी अंतरावर पनवेलजवळ हे विमानतळ बांधण्यात आले आहेत.
हे ही वाचा