एक्स्प्लोर

White House : 132 खोल्या आणि 412 दरवाजे, व्हाईट हाऊसची आलिशान इमारत आतून कशी दिसते?

White House Interior : व्हाईट हाऊस ही सहा मजल्यांची आलिशान इमारत आहे. या इमारतीला बांधण्यासाठी तब्बल आठ वर्षे लागली होती. या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात 1792 मध्ये सुरु झाली आणि 1800 पर्यंत पूर्ण झाले.

White House Interior : पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जून ते 24 जूनपर्यंत अमेरिकेरेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. व्हाईट हाऊस (White House) ही जगातील प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांच्या कुटुंबासह इथे राहतात. या इमारतीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. एवढेच नाही तर व्हाईट हाऊसच्या इमारतीवरुन कोणतेही विमान किंवा हेलिकॉप्टरही उड्डाण करु शकत नाही. ही आलिशान इमारत आतून कशी दिसते ते जाणून घेऊया.

कधी बांधले होते व्हाईट हाऊस?

सहा मजल्यांची इमारत असणाऱ्या या आलिशान व्हाईट हाऊसला बांधण्याकरता आठ वर्षे लागली होती. या इमारतीचे बांधकाम 1792 मध्ये सुरु झाले आणि 1800 पर्यंत पूर्ण झाले. इमारतीची आकर्षक रचना आयर्लंडच्या जेम्स होबन यांनी केली होती. ही इमारत सुमारे 18 एकरमध्ये पसरलेली आहे. व्हाईट हाऊसचे सुरुवातीचे नाव प्रेसिडेंट पॅलेस असे होते. 

132 खोल्या आणि 412 दरवाजे 

व्हाईट हाऊसमध्ये 132 खोल्या, 35 बाथरुम, 412 दरवाजे, 147 खिडक्या, 28 फायरप्लेस, 3 लिफ्ट आणि दोन तळघरे आहेत. सोबतच यात दोन सार्वजनिक मजले आहेत आणि बाकी खोल्या या राष्ट्रपतींसाठी आहेत. व्हाईट हाऊसमधील खोल्या उत्तम शैलींचा वापर करुन सजवल्या गेल्या आहेत. 

व्हाईट हाऊसमधील काही खास खोल्या

ओव्हल ऑफिस (Oval Office)

ओव्हल ऑफिस हे राष्ट्रपतींचे अधिकृत कार्यालय आहे. याच ठिकाणी ते अनेक परदेशी नेत्यांना भेटतात. सर्व महत्त्वाची कामं देखील याच ठिकाणी केले जातात.

स्टेट डायनिंग रुम (State Dining Room)

येथे राष्ट्रपतींकडून परदेशी मान्यवरांकरता भोजनाचे आयोजन केले जाते. या खोलीत 140 लोक एकावेळी जेवण करु शकतात. ही खोली सोन्याच्या झुंबंरांनी सजवण्यात आलेली आहे. 

रेड रुम (Red Room)

रेड रुम व्हाईट हाऊसमधील आणखी एक स्वागत कक्ष आहे. हे लाल डमास्क वॉलपेपर आणि फर्निचरसह सजवलेले आहे. खोलीत एक मोठी फायरप्लेस आणि एक झुंबर आहे. हे सहसा विवाहसोहळा आणि इतर विशेष कार्यक्रमांसाठी वापरले जाते.

ग्रीन रुम (Green Room)

ग्रीन रुम ही व्हाईट हाऊसमधील एक अतिशय महत्त्वाच्या खोलींपैकी एक आहे. याचा वापर मीटिंग्ज आणि खाजगी कार्यांसाठी केला जातो. ही खोली हिरव्या डमास्क वॉलपेपर आणि फर्निचरने सजलेली आहे. त्यात एक मोठी शेकोटी आणि झुंबर आहे.

इतर अनेक सुविधा

या खोल्यांव्यतिरिक्त, व्हाईट हाऊसमध्ये लायब्ररी, चित्रपटगृह आणि स्विमिंग पूल यासह इतर अनेक जागा आहेत. व्हाईट हाऊसमध्ये अनेक ऐतिहासिक कलाकृतींचाही समावेश आहे. व्हाईट हाऊस हे अमेरिकन लोकशाही आणि शक्तीचे प्रतीक आहे. त्याचे आतील भाग देशाच्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

PM Modi US Visit: 'हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान', व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget