PM Modi US Visit: 'हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान', व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण
PM Modi US Visit:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये संबोधित देखील केले.
PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची व्हाईट हाऊसमध्ये (White House) भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसवर उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिका-भारताचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी यावेळी म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुन्हा एकदा राजकीय दौऱ्यावर स्वागत करण्याचे यजमानपद मला मिळाले या गोष्टीचा मला आनंद आहे. मी जेव्हा उपराष्ट्रपती होतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बराच वेळ घालवला होता.' पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'अमेरिका आणि भारत ही दोन्ही राष्ट्र तीन शब्दांनी बांधली गेली आहेत, 'We The People''
बायडेन यांनी म्हटलं की, 'भारत आणि अमेरिका प्रत्येक गोष्टीवर एकत्र मिळून काम करत आहे. ही गोष्ट भारत, अमेरिका आणि संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही आज जे काही निर्णय घेऊ ते येणाऱ्या पिढीसाठी प्रोत्साहन देणारे असतील.'
तसेच बायडेन यांनी म्हटलं की, 'दोन्ही देश गरिबी घालवण्यासाठी, आरोग्य सेवेचा विस्तार करण्यासाठी आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे निर्माण झालेल्या अन्न आणि ऊर्जेच्या समस्यांचा सामना करण्यसाठी एकत्र मिळून काम करत आहोत.'
काय म्हणाले जो बायडेन?
बायडेन यांनी व्हाईट हाऊसवर भाषण करताना म्हटलं की, 'आम्ही स्वतंत्र, मुक्त, सुरक्षित आणि समृद्ध इंडो-पॅसिफिकसाठी 'क्वाड'ला मजूबत करण्याचे काम करत आहोत. आतापासून अनेक दशकांनंतर लोकं जेव्हा मागे वळून बघतील तेव्हा ते नक्की म्हणतील की 'क्वाड'ने जगाच्या चांगल्यासाठी इतिहासातील दिशा बदलल्या आहेत.'
त्यांनी पुढे म्हटलं की, 'मला कायम असा विश्वास वाटतो की भारत आणि अमेरिकेमधील हे संबंध 21 व्या शतकातील महत्त्वपूर्ण संबंध आहेत. आमच्या संविधानाचे पहिले तीन शब्द हेच आहेत की, आम्ही देशाचे नागरिक.'
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
बायडेन यांच्या स्वागतपर भाषणानंतर पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. त्यांनी म्हटलं की, 'आज व्हाईट हाऊसमधील हा स्वागत सोहळा 140 कोटी भारतीयांच्या सन्मानासाठी आहे.' त्यांनी म्हटलं की, 'मी तीन दशकांपूर्वी जेव्हा आलो होतो, तेव्हा मी व्हाईट हाऊस बाहेरु पाहिले होते. मी बऱ्याचदा अमेरिकेत आलो आहे. पण पहिल्यांदाच एवढ्या भारतीयांसाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.'
पंतप्रधानांनी पुढे बोलतांना म्हटलं की, 'आम्हाला दोन्ही देशांच्या विविधेवचा अभिमान आहे. अमेरिकेतील भारतीयांनी मेहतीने अमेरिकेमध्ये भारताचा मान उंचावला आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या संबंधांची खरी ताकद आहात. '
महत्त्वाच्या इतर बातम्या
India US: भारत-अमेरिकेचे 'मिशन स्पेस'; 2024 मध्ये संयुक्त अंतराळ मोहिमेची घोषणा