मी दोषी नाही... डोनाल्ड ट्रम्प कोर्टात शरण; व्हाईट हाऊसमधीस संवेदनशील कागदपत्रांच्या चोरीचा आरोप
Donald Trump Secret Document Case: ट्रम्प यांनी शॉवर आणि बॉलरूममध्ये क्लासीफाईड कागदपत्रे (संवेदनशील माहिती असलेली कागदपत्रे) ठेवली होती
![मी दोषी नाही... डोनाल्ड ट्रम्प कोर्टात शरण; व्हाईट हाऊसमधीस संवेदनशील कागदपत्रांच्या चोरीचा आरोप us secret document case ex president donald trump pleads not guilty stealing sensitive white house documents मी दोषी नाही... डोनाल्ड ट्रम्प कोर्टात शरण; व्हाईट हाऊसमधीस संवेदनशील कागदपत्रांच्या चोरीचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/16/ae74377e00f3f8e5cc0314a59d60f07a1668566524613607_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Donald Trump Secret Document Case: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) मंगळवारी (13 जून) मियामीच्या फेडरल कोर्टात दाखल झाले होते. गोपनीय कागदपत्रं बाळगल्याच्या (Secret Document Case) आरोपांना सामोरं जाण्यासाठी ट्रम्प दाखल झाले आणि याप्रकरणी त्यांनी आत्मसमर्पण केलं. न्यूज एजन्सी एएफपीनं दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ट्रम्प यांनी आपल्याला दोषी ठरवू नये, अशी विनंतीही न्यायालयाला केली आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात शेकडो गोपनीय कागदपत्रे आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांनी ट्रम्प यांच्यावर या प्रकरणांमध्ये आरोप निश्चित केले आहेत.
याआधी शुक्रवारी (9 जून) गोपनीय माहिती प्रकरणात ट्रम्प यांच्यावरील फेडरल आरोप सार्वजनिक करण्यात आले होते. त्याच्यावर गोपनीय माहिती बाळगणे, न्यायात अडथळा आणणं आणि खोटी वक्तव्य करणं असं तब्बल 37 गुन्हे दाखल आहेत. ट्रम्प यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप हास्यास्पद आणि निराधार असल्याचं म्हटलं होतं.
2021 मध्ये गुप्तचर माहिती असलेली कागदपत्रं बाळगल्याचा आरोप
न्याय विभागानं सांगितलं होतं की, ट्रम्प यांनी जानेवारी 2021 मध्ये व्हाईट हाऊस सोडलं तेव्हा त्यांनी पेंटागॉन, सीआयए, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी आणि इतर गुप्तचर संस्थांकडील अत्यंत संवेदनशील माहिती असलेल्या गोपनीय फाइल्स सोबत घेतल्या होत्या. स्काय न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी बाथरुममध्ये गुप्तचर माहिती असलेली कागदपत्रे ठेवली होती.
ट्रम्प यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये म्हटलंय की, त्यांच्या मार-ए-लागो इस्टेटमध्ये कागदपत्रांचे बॉक्स नेण्यात ट्रम्प यांचा समावेश होता. एपीच्या अहवालानुसार, एफबीआयनं ट्रम्प यांच्या निवासस्थानातून जप्त केलेल्या गुप्त नोंदींमध्ये परदेशी देशाच्या आण्विक क्षमतेच्या तपशीलांचाही समावेश आहे.
अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल
फ्लोरिडा येथील फेडरल कोर्टानुसार, ट्रम्प यांनी संवेदनशील माहितीच्या फाईल त्यांच्या फ्लोरिडामधील त्यांच्या मार-ए-लीगो निवासस्थान आणि क्लबमध्ये कागदपत्रे असुरक्षित ठेवल्या. या ठिकाणी नियमितपणे हजारो पाहुण्यांसोबत मोठ्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ट्रम्प यांची ही कृती अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणू शकतो. न्याय विभागाचे विशेष वकील जॅक स्मिथ यांनी लावलेल्या प्रत्येक आरोपासाठी ट्रम्प यांनी 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
नियमांनुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सर्व ईमेल, कागदपत्रे नॅशनल आर्काइव्हजकडे जमा करावी लागतात. ट्रम्प यांच्यावर अनेक गोपनीय कागदपत्रे नष्ट करण्याचा तर काही आपल्या घरी नेल्याचा आरोप आहे. मात्र ट्रम्प जेव्हा व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी अनेक कागदपत्रे सोबत घेतल्याचा आरोप आहे. ही कागदपत्रे अनेक मोठ्या बॉक्समध्ये मार-ए-लीगो येथे नेण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)