एक्स्प्लोर

MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लाईव्ह पाहाता येणार

MLA Disqualification Case : गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या (Maharashtra News) जनतेनं न भूतो न भविष्यती असे एक ना अनेक बदल अनुभवले आहेत. राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडल्या. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे

MLA Disqualification Case : गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या (Maharashtra News) जनतेनं न भूतो न भविष्यती असे एक ना अनेक बदल अनुभवले आहेत. राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडल्या. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. आज म्हणजेच, 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार (Shiv Sena MLA Disqualification Case) अपात्रता सुनावणीचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, हा संपूर्ण निकाल सर्वांना लाईव्ह पाहाता येणार आहे. विधीमंडळाकडून याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं असून आमदारांचीच नाहीतर संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचून दाखवणार असल्यामुळे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे. सध्या या निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम विधिमंडळात सुरू आहे. पण साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीचा निर्णय येणार असल्यानं सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच (CM Eknath Shinde) अपात्र ठरले, तर त्यांना पदावरुन पायउतार व्हावं लागणार? की शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागणार? पण हेच जर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले, तर तो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का असेल. कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत आणि तेही अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो. 

महाराष्ट्राच्या राजाकारणात एवढा मोठा भूकंप होण्यासाठी कारणीभूत ठरलं ते म्हणजे, शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचं बंड. एकनाथ शिंदेंनी काही आमदारांसह मुंबईहून सूरत आणि थेट गुवाहाटी गाठलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. शिवसेतेच उभी फूट अशी बातमी झळकली आणि शिवसेनेतीन वरिष्ठांसह अगदी सामान्य शिवसैनिकांपर्यंत सगळ्यांची धाकधूक वाढली. नेमकं काय झालं? कसं झालं? कारण काय? यांसारखे प्रश्न पडायच्या आतच शिंदेंनी सूरत आणि तिथून गुवाहाटी गाठलं होतं. हे सर्व घडत असताना शिंदेंच्या मागे होती, 'महाशक्ती'. 

नेमकं काय घडलं? 

2022 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाला आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आणि आधीच्या टर्ममध्ये सत्तेत असलेली भाजप विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसली. पुढे 2022 मध्ये राज्यसभा आणि त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. याच निवडणुकांनंतरच शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस बंडाच्या स्वरुपात बाहेर पडली. त्यानंतर महाराष्ट्रानं अनुभवला न भूतो न भविष्यती असा 'राजकीय भूकंप'.  

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधी बाकावर बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सर्व उमेदवारांच्या विजयानं महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली. निवडणुकीची रात्र सरते ना सरते तोवर प्रसार माध्यमांमध्ये बातमी झळकली की, शिवसेनेचे अनेक आमदार नॉट रिचेबल असून ते गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचले आहेत. सर्वांच्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली जेव्हा या सूरतमध्ये असलेल्या आमदारांमध्ये शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदेंचं नाव समोर आलं. एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील एक, दोन नव्हे तर तब्बल 26 आमदार गुजरातमधील सूरत शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. एकीकडे एकनाथ शिंदेंनी बंड केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत होत्या आणि दुसरीकडे संपूर्ण राज्यासह देशाच्या नजरा मातोश्रीकडे खिळल्या होत्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Bhaskar Jadhav : कधी पंतप्रधानांची तर कधी मुख्यमंत्र्यांची नक्कल! हाडाचे शिवसैनिक आणि आक्रमक राजकारणी भास्कर जाधव पात्र की अपात्र?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaZero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget