एक्स्प्लोर

GST Slab Change : सरकारचा दिवाळी धमाका! GST स्लॅबमध्ये मोठा बदल; दूध-पनीर, टीव्ही, सिमेंट आणि रोजच्या कोणत्या वस्तू स्वस्त?

GST Council Meeting Update : कृषी उत्पादनावरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणला आहे. तर सिमेंटवर असलेला 28 टक्क्यांचा जीएसटी हा 18 टक्क्यांवर आणला आहे.

नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब असतील. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनीच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये बदल होणार असे सांगितले होते. त्यावर आता बैठकीत निर्णय झाला.

देशात लागू असलेल्या 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्या गोष्टींवर आधी 28 टक्के जीएसटी लागायचा त्यावर आता 18 टक्के जीएसटी लागणार आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टींवर आधी 12 टक्के जीएसटी लागायचा, त्यावर आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे. तर काही वस्तूंवरील जीएसटी हा शून्य टक्के करण्यात आला आहे.

Key Decisions in GST Council : कोणत्या वस्तू स्वस्त होणार

रोटी, पनीर आणि दूध (Food Items GST):

– सर्व प्रकारच्या रोटी, पनीर, प्रोसेस्ड दुधावरील कर पूर्णपणे रद्द.

– दैनंदिन जीवनातील वस्तूंवर 5% स्लॅब लागू.

कृषी उत्पादने (Agri Goods GST):

– कृषी उत्पादनांवरील जीएसटी 12% वरून 5% मध्ये आणला.

– शेतकऱ्यांच्या वापरातील बहुतांश वस्तूंवरील करात घट.

घर आणि बांधकाम साहित्य (Housing & Cement GST):

– मध्यमवर्गासाठी दिलासा; सिमेंट 28% वरून 18% वर आणले.

औषधे (Medicines GST):

– कॅन्सर आणि रेअर ड्रग्सवर जीएसटी कमी.

वाहन क्षेत्र (Automotive Sector GST):

– ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा दिलासा; आता जीएसटी फक्त 18%.

– बस, ट्रक, अॅम्ब्युलन्स, थ्री-व्हीलर आणि ऑटो पार्ट्स यांवर कर घटला.

दैनंदिन वस्तू (Daily Use Items GST):

– साबण, टूथपेस्ट, शॅम्पू यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी 18% वरून 5% किंवा 0% करण्याची तयारी.

इन्शुरन्स (Insurance GST):

– इंडिव्हिज्युअल हेल्थ, लाइफ व रिइन्शुरन्स पॉलिसींवरील कर पूर्णपणे रद्द.

– टर्म लाइफ, ULIP, एंडोमेंट पॉलिसी, फ्लोटर पॉलिसी व वरिष्ठ नागरिकांसाठीच्या पॉलिसींवर पूर्ण सूट.

विशेष 40% श्रेणी (Special 40% GST Slab):

– सिन गुड्स (Sin Goods) जसे की पान मसाला, तंबाखू तसेच अल्ट्रा लक्झरी वस्तूंवर हा 40 टक्के कराचा स्लॅब लागू होणार.

ही बातमी वाचा:

अभिजीत विलासराव जाधव हे 'एबीपी माझा' डिजिटलमध्ये असोसिएट प्रोड्युसर असून त्यांना पत्रकारितेचा साडेसहा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. कुटुंब मूळचे सीमाभागातील निपाणी तालुक्यातील, पण सामाजिक क्रांतीचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जन्म आणि शिक्षण. अभिजीत यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

राज्यशास्त्र, इतिहास आणि यूपीएससी अभ्यासाच्या पार्श्वभूमीमुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचे सखोल विश्लेषण असते. शेतकरी कुटुंबातून असल्याने शेती, ग्रामीण प्रश्न आणि संस्कृतीची त्यांना जाण आहे. अचूकता आणि वेगाचा मेळ घालत ब्रेकिंग न्यूज, राजकीय आणि सामाजिक विषयांवर विशेष लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Embed widget