एक्स्प्लोर

लव्ह मॅरेजचा भयाकन द एन्ड; पतीनेच मुस्कानचं शिर धडावेगळं केलं; पोलिस तपासात गूढ उलगडलं

भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांसह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद कुंभार व पथकातील पोलिसांनी ईदगाह झोपडपट्टीत माहिती घेण्यास सुरुवात केली.

ठाणे : भिवंडी (Bhiwandi) शहरातील खाडी लगतच्या ईदगाह झोपडपट्टीजवळील दलदलीत 30 ऑगस्ट रोजी महिलेचं धडावेगळं शिर आढळून आल्यानंतर या महिलेची हत्या केलेल्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक भोईवाडा पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवून 48 तासात हत्या करणाऱ्या आरोपी पतीस अटक केली. परवीन उर्फ मुस्कान (वय 26) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून या गुन्ह्यात पती तहा इम्तियाज अन्सारी याला अटक केली आहे. ईदगाह झोपडपट्टी जवळील खाडी लगतच्या दलदलीत 30 ऑगस्ट रोजी धडा वेगळे महिलेचे शिर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. तर महिलेची ओळख पटवणे व त्यानंतर हत्येचा आरोपी पकडण्याचे मोठे आव्हान भोईवाडा पोलिसांसमोर (Police) होते.

भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांसह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद कुंभार व त्यांच्या पोलिस पथकातील पोलिसांनी ईदगाह झोपडपट्टीत माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये येथील एक महिला दिसत नसल्याबद्दल माहिती समोर आली.त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करीत चौकशीस सुरुवात केली. त्यामध्ये परवीन उर्फ मुस्कान या महिलेचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर माहिती घेतली असता तिचा चालक पती घरी नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी शोध घेत त्यास 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पतीला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर पती तहा याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी त्यास घटनास्थळी नेऊन हत्या केलेल्या पत्नीचे धड कोठे आहे, त्याबाबत शोध घेण्यासाठी खाडी पात्रात बोटीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला.

दोन वर्षांपूर्वी तहा अन्सारी व मुस्कान अन्सारी यांनी प्रेमविवाह केला होता, त्यांना एक वर्षाचा मुलगा देखील आहे. ज्याचं नाव मोहम्मद अजलान अंसारी आहे. तहा अन्सारी व मुस्कान अन्सारी यांच्यामधील असलेल्या प्रेमात मिठाचा खडा पडला. दोघेही एकमेकांवर चारित्र्यावरुन संशय घेत होते आणि त्यामध्ये त्यांच्यात भांडण देखील होत होतं. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. शिवाय मुस्कान अन्सारी ही इंस्टाग्रामवर रील बनवत, त्यासाठी तिला काही मुलंही भेटत होती. परंतु, त्यामुळे त्यांच्यात आणखी भांडण होत असून त्यांच्यात हाणामारी सुद्धा होत असे. त्यातून परवीन ही 28 ऑगस्ट रोजी रिल्स बनवण्यासाठी घरातून निघून गेली होती, त्यातून वाद झाला. तर दुसरीकडे परविन आपल्या मुलाला देखील मारहाण करत होती या सगळ्या गोष्टीवरून दोघांमध्ये खूप भांडण व हाणामारी होत होती आणि याच भांडणातून अखेर पती तहा इम्तियाज अन्सारी याने 29 ऑगस्ट रोजी पत्नी परवीन हिची क्रूरपणे हत्या केली.

पत्नीचे शिर धडापासून वेगळे करीत आरोपी पतीने शरीराचे दोन तुकडे करीत ते खाडीत भरतीचे पाणी वाढले असताना त्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह फॉरेन्सिक पथक व श्वान पथकास पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण अजूनही धड आढळून न आल्याने खाडी लगतच्या पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपी पती तहा इम्तियाज अन्सारी या भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास 11 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

चिमुकला झाला पोरका

दरम्यान, या घटनेत एक वर्षाचा मोहम्मद अजलानची काय चूक होती. बापाकडून आईची हत्या या एक वर्षाच्या मोहम्मद अजलानच्या समोरच झाली . प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याचा भयानक अंत पाहायला मिळाला. मात्र, यामध्ये आई गमावली आणि बाप जेलमध्ये गेल्याने मुलगा आता एकटा पडला आहे, सध्या या मुलाला नातेवाईकांनी आपल्यासोबत घेत त्याचा सांभाळ सुरू केलाय. चिमुकल्या मोहम्मदला पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

चंद्रपुरात सत्तांतर... शिवसेनेतून कालच भाजपात प्रवेश आज बाजार समितीवर एकहाती सत्ता; सभापतीपदी राजेंद्र डोंगे

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधानीतील क्लोरीन गळतीप्रकरणी कंत्राटदार अन् टोनर पुरवठादारावर निष्काळजीपणाचा ठपका; तपास समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल
नागपूरच्या गोधानीतील क्लोरीन गळतीप्रकरणी कंत्राटदार अन् टोनर पुरवठादारावर निष्काळजीपणाचा ठपका; तपास समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget